आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, रिअल लाइफमध्ये \'कॉमेडी नाइट्स\'च्या बुआचे पतीसोबत का होते भांडण?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठीने 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ची बुआ अर्थातच उपासना सिंहसोबत बातचीत केली. यावेळी तिने विशेष म्हणजे आपल्या वेशभूषेविषयी बातचीत केली. तिने सांगितले, की कपड्यांमुळे तिचे नेहमी आपल्या पतीसोबत भांडण होते. जाणून घेऊया, उपासनासोबत झालेल्या बातचीतचे काही अंश...
'माझ्या घरात जेवढ्या अलमारी आहेत, त्यामध्ये केवळ एकच माझ्या पतीचे आहे. इतर अलमारीमध्ये माझेच कपडे भरलेले आहेत. जो ड्रेस मी आज परिधान केला आहे, तो एक वर्षानंतर घालते. माझे कपड्यांमुळे पतीसोबत नेहमी भांडण होते. माझ्या वार्डरोबमध्ये प्रत्येक प्रकारचा ड्रेस आहे. परंतु मला अनारकली सूट सर्वात जास्त आवडतो. साडी मी खूप कमीवेळा नेसते. कारण मला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही. मला शॉपिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून घरातील सदस्य माझ्यासोबत येण्याचे टाळतात. प्रत्येक कलरचा ड्रेस माझ्याकडे आहे. मला जीन्स, टी-शर्ट सर्वात कम्फर्टेबल वाटते.'
'एक संपूर्ण वार्डरोब माझ्या टी-शर्टने भरलेली आहे. स्क्रिनवर मला टाइट आणि फिटेड ड्रेसमध्ये जेवढे पाहिल्या जाते, ख-या आयुष्यात मी तेवढीच त्यांच्यापासून दूर आहे. शोच्या सुरुवातील मी काफ्तान परिधान करायचे. त्यावेळी एका दुकानदाराने मला सांगितले, की जेव्हापासून मी काफ्तान घालण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्याच्या दुकानातील काफ्तान पट-पट विकायला लागले. मला एकून आश्चर्य वाटले, की लोक टीव्ही पाहून इतक्या लवकर फॅशन फॉलो करतात.'
'मी ब्रँड कॉशियन्स अजिबात नाहीये. जर डिझाइनर ड्रेसेस परिधान करते, तर स्ट्रीट मार्केटमधूनसुध्दा कपडे खरेदी करते. कुणी माझ्या घरी आले तर त्याला माझ्या कपड्यांशिवाय दुसरे काहीच विशेष दिसणार नाही. माझे पती नेहमी म्हणतात, आम्हाला अलमारी घाबरून उघडावी लागते. कारण ते जेव्हा अलमारी उघडतात, तेव्हा त्यांच्या अंगावर कपड्यांचा ढीगार कोसळतो. मी माझ्या लग्नाचे सर्व कपडे आजही जपून ठेवले आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'कॉमेडी नाइट्स'मध्ये परिधान केलेल्या आऊटफिट्समध्ये बुआची छायाचित्रे...