आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: 'दयाबेन'ने उलगडले रहस्य, कुणाच्या सांगण्यावरून मिळाली 'तारक मेहता...'मधील भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दयाबेन अर्थातच वाकाणी)
मुंबई: अभिनेत्री वाकाणी सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कॉमेडी शोमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. शोचे 1500 एपिसोड्स पूर्ण झाल्याने Dainikbhaskar.Comने तिच्याशी बातचीत केली. अहमदाबाद, गुजरातमध्ये जन्मलेली दिशा जवळपास 15-16 वर्षांपासून मुंबईमध्ये राहत आहे. खासगी आयुष्यातसुध्दा ती दयाबेनसारखीच सकारात्मक दृष्टीकोणाची बाळगणारी आहे. परंतु ती दयाबेनसारखी बोलत नाही. या बातचीतदरम्यान जेठलाल अर्थातच दिलीप जोशीच्या रेफरन्सने तिला दयाबेनची भूमिका मिळाली. जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्याविषयी...
शोमध्ये आतापर्यंतचा तुझा अनुभव कसा होता?
शोमध्ये आतापर्यंतच अनुभव खूपच शानदार राहिला. 1500 एपिसोड्स पूर्ण झाल्याने शोचा प्रत्येक दिवस पहिल्या दिवसाप्रमाणे वाटतो. आम्ही इतका मोठा प्रवास पूर्ण केला याचा विश्वास बसत नाहीये. मला याचा विचार करून आनंद आणि समाधान वाटत आहे, की मी शोमधील एक साकारात्मक महिलेचे पात्र साकारत आहे. ख-या आयुष्यातसुध्दा मी दयाबेनसारखी आहे. देवाचा आशिर्वाद नेहमी माझ्यासोबत असतो आणि ते 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सर्व टीमवर असाच आशिर्वाद कायम ठेवतील.
तुझा काय छंद आहे?
मी खूप झोपाळू आहे, त्यामुळे मला झोपायला आवडते. मला जेव्हा कधी वेळ मिळतो मी झोपते. त्यामुळे माझा थकवा दूर होतो. शिवाय मला पुस्तक वाचणे आणि सितार, बासरी आणि हार्मोनिअमसारख्या वाद्यांचे मधूर संगीत ऐकायला आवडतात. मला गायन, जेवण बनवणेसारख्या गोष्टीसुध्दा शिकायच्या आहेत.
ख-या आयुष्यात तू दयाबेनसारखे बोलतेस का?

नाही, मी ख-या आयुष्यात एका सामान्य तरुणीप्रमाणे बोलते. ऑडिशनवेळी निर्माता असित मोदीने मला विचारले होत, की तू एकाच सुरात रडू, हसू आणि गाऊ कशी शकतेस? त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास मी कायम जपून ठेवल.
मालिकेत सर्वात महत्वाची भूमिका तुझीच आहे.
'शोले' सिनेमासारखा आमचा शो आहे. या सिनेमात ज्याप्रकारे प्रत्येक पात्राला महत्व आहे, तसेच आमच्या मालिकेत प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. सर्व कलाकार थिएटरचे आहेत आणि सर्व आपल्या परीने योग्य आहेत.
'तारक मेहता...'मध्ये तुला संधी कशी मिळाली?
'तारक मेहता...'करण्यापूर्वी मी 'सीआयडी', 'आहट', 'क्राइम पेट्रोल' आणि 'खिचडी'सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. दिलीप जोशी (जेठलाल)च्या ओळखीने मी असित सरांना भेटले. त्यांनी दयाबेनच्या पात्रात मला पाहिले. त्यानंतर माझा निवड झाली. मागील सहा वर्षांपासून मी त्यांना कधीच निराश केले नाही याचा मला आनंद आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दयाबेन अर्थातच दिशा वाकाणीचा रिअल अवतार...