आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview : 3000 रु. होती \'गोपी बहू\'ची पहिली सॅलरी, जाणून घ्या सध्या काय करतेय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जिया माणिक)
 
मुंबई - गोपी बहू या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जिया माणिकच्या मते, करिअरच्या बाबतीत तिने काही चुकीचे निर्णय घेतले. मग ते \'साथ निभाना साथिया\' ही मालिका सोडणे असो, किंवा \'झलक दिखला जा\' या डान्स रिअॅलिटी शोसाठी स्टार प्लस वाहिनीसोबत झालेले भांडण, या सगळ्यामुळे तिच्या करिअरला मोठा फटका बसला. करिअरचा ग्राफ उंचावण्याऐवजी खाली घसरल्यानंतर आता जिया आपल्या खासगी आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे.
सलमान खानची जबरदस्त फॅन असूनदेखील जिया \'बिग बॉस\' या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही. तिच्या मते, आता तिच्या आयुष्यातील वाईट काळ संपुष्टात आला आहे. अलीकडेच divyamarathi.com ला दिलेल्या मुलाखतीत जिया तिच्या करिअरमध्ये
आलेल्या चढउतारांबद्दल बोलली. जाणून घ्या काय म्हणाली जिया...
 
\'जीनी आणि जूजू\' या मालिकेनंतर तुझ्या हातात कोणताही प्रोजेक्ट नाहीये. सध्या तू काय करत आहेस?
- जे गेल्या पाच वर्षांत मला करणे जमले नाही, ते सर्व मी या काळात करत आहे. आरोग्य, कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांना मी बॅक सीटवर ठेवले होते. जेव्हापासून मी घरी आहे, तेव्हापासून मी याची भरपाई करत आहे. गेल्या काही वर्षांत मी हे सर्व गमावून बसले होते. मी मनमोकळेपणाने आपले आयुष्य जगत आहे. माझ्याजवळ सिनेमे बघण्यासाठी किंवा पार्टी करण्यासाठी मुळीच वेळ नसायचा. आता मात्र मी मित्रांसोबत भरपूर वेळ घालवत आहे, शिवाय कुटुंबालासुद्धा वेळ देणे मला जमत आहे. हा ब्रेक मी पूर्णपणे एन्जॉय करत आहे.
 
तुझी पहिली सॅलरी किती होती?
- मी माझ्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्राद्वारे कील होती आणि मला पहिला पगार म्हणून तीन हजार रुपये मिळाले होते.  
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी काय-काय म्हणाली जिया...