मुंबईः याच वर्षी 24 जानेवारी रोजी लग्नगाठीत अडकलेले अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी 'नच बलिये'च्या सातव्या पर्वाचे विजेतेपद
आपल्या नावी केले आहे. Divyamarathi.com ला दिलेल्या एका खास मुलाखतीत या कपलने या कार्यक्रमाशी निगडीत आठवणी आणि आपल्या पर्सनल लाइफविषयीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या.
अमृता सांगते, "शोचे विजेतेपद आपल्या नावी करण्याचे प्रामाणिक स्वप्न आम्ही पाहिले होते आणि आज ते सत्यात उतरले आहे. इतर कपल्सना टफ फाइट देण्यासाठी आम्ही शोमध्ये एन्ट्री घेतली नव्हती. तर जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवता यावा, यासाठी या शोमध्ये आम्ही दोघे आलो होतो. भारतातील हा पहिला असा शो आहे, जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सहभागी होऊ शकता. त्यामुळे ही खूप चांगली संधी आम्हाला मिळाली होती. लग्नाच्या 8 दिवसानंतर आम्हाला नच बलिये 7 ची ऑफर मिळाली आणि आम्ही ती स्वीकारली. शोमध्ये सहभागी होणे हे आमचे बेस्ट डिसिजन ठरले."
शोसंबंधित आठवणी शेअर करताना अमृता म्हणाली, "तीन महिन्यांच्या या प्रवासात खूप सुंदर आठवणी असून सर्वच आमच्यासाठी अतिशय खास आहेत. सुरुवातीपासूनच बेस्ट परफॉर्मन्स देणे हेच आमच्या डोक्यात होते. शोचे विजेते ठरण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली."
हिमांशू मल्होत्राच्या मते, अमृता त्याच्यासाठी खूप लकी आहे. तो म्हणतो, ''गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही दोघे एकमेकांना ओळखता. चांगल्या वाईट काळात आम्ही एकमेकांना साथ दिसली. लग्न करणे माझ्यासाठी सर्वात चांगला निर्णय ठरला आहे. आठ दिवसांतच आम्हाला 'नच बलिये 7' ची ऑफर मिळाली आणि खास गोष्ट म्हणजे आम्ही हा शो जिंकलासुद्धा.''
रविवारी 'नच बलिये 7' चा ग्रॅण्ड फिनाले रंगला होता. यामध्ये करिश्मा तन्ना-उपेन पटेल. रश्मी देसाई-नंदीश संधू आणि अजिशा-मयुरेश यांना मात देत अमृता आणि हिमांशूने हा किताब आपल्या नावी केला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या कपलची खास छायाचित्रे...