आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Struggle: 160 कॅरेक्टर्स साकारल्यानंतरसुद्धा ओळखत नव्हते लोक, मग असा फेमस झाला हा अॅक्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः हा आहे अभिनेता योगेश त्रिपाठी. छोट्या पडद्यावर योगेशला आपण हप्पूसिंह या आळशी पोलिसाच्या भूमिकेत बघतोय. 'भाभीजी घर पर है' या मालिकेत गोलमटोल आणि केसांच्या विशिष्ट ठेवणसाठी हप्पू सिंहला ओळखले जाते. मात्र खासगी आयुष्यात योगेश त्रिपाठी अगदी स्लिमट्रीम आहे. हप्पू सिंहसारखे त्याचे पोट सुटलेले नाही. योगेशचे लग्न झालेले असून त्यांच्या पत्नीचे नाव सपना आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. गंमतीचा भाग म्हणजे त्यांचा मुलगासुद्धा त्याला  हप्पू सिंह म्हणून हाक मारतो.

खासगी आयुष्यात कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर त्याने अभिनय क्षेत्रात यश मिळवले आहे. योगेशने गणित विषयात बीएस्सी केले आहे. पण अभिनयाची आवड असल्याने तो या क्षेत्राकडे वळले. त्यांना अनेक वर्षे मुंबईत काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. 

योगेशने त्याचा हा संघर्षाचा काळ आमच्यासोबत शेअर केला आहे.  

- योगेशने सांगितले, की माझ्या कुटुंबात बीएस्सी पूर्ण करुन शिक्षण क्षेत्रात काम करण्याची परंपरा आहे. माझे वडील फिजिक्सचे शिक्षक आहेत. तर दोन्ही बहिणी आणि भाऊसुद्धा शिक्षक आहेत.  
- घरातील प्रत्येक सदस्यासाठी माझ्या वडिलांनी एक नियम केला होता. तो म्हणजे लखनऊ येथे जाऊन बीएस्सी पूर्ण करायचे आणि नंतर शिक्षक म्हणून नोकरी करायची. पण मला बालपणापासूनच अभिनयाची आवड राहिली. यूपीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मी आवर्जुन सहभागी होत असे.  
- एकेदिवशी माझ्या वडिलांनी माझ्यासाठीसुद्धा लखनऊला जायचे फर्मान सोडले. मी लखनऊला पोहोचलो पण अभिनयाची साथ सोडली नाही.  
- बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि वडिलांसोबत खोटे बोलून थिएटर जॉईन केले. अनेक पथनाट्यांमध्ये अभिनय केला. घरी परतायला बराच उशीर होत असे.  - घरी यायला नेहमी उशीर का होतो, असे वडील मला नेहमी विचारायचे. तेव्हा मी एका कोर्सला प्रवेश घेतला, असे त्यांना खोटे सांगितले होते. खरं तर वडिलांसोबत खोटे बोलणे मला आवडत नसे. पण छंद जोपासण्यासाठी मी असे करायचो.  

160 विविध भूमिका साकारल्या पण लोक ओळखत नव्हते..
- योगेशने पुढे सांगितले, की एकेदिवशी वृत्तपत्रात वडिलांनी माझे छायाचित्र पाहिले. आणि मग मात्र चांगलाच गोंधळ निर्माण झाला. पण मी वडिलांची समजूत घालण्यात यशस्वी ठरलो. 
- मग मी हजारांहून अधिक पथनाट्यांमध्ये अभिनय केला. मी एनएसडीचे काही वर्कशॉप्ससुद्धा केले. त्यानंतर 2005 साली कुटुंबीयांच्या परवानगीने मुंबई गाठली. येथे अनेक स्ट्रगलर्स मी पाहिले. कुठेच मलादेखील काम मिळत नव्हते. 

क्लोरमिंटच्या जाहिरातीने केले हिट..
- जवळपास दोन वर्षे स्ट्रगल केल्यानंतर योगेशला 2007 साली क्लोरमिंटची जाहिरात भेटली ज्यात त्याने कबड्डी प्लेअरची भूमिका केली होती.
- ही जाहिरात फार लोकप्रिय झाली आणि त्यानंतर योगेशने जवळपास 47 जाहिरातीत काम केले.

12-12 तास उभा राहायचा रांगेत..
- योगेशने सांगितले की, लखनऊमध्ये चार वर्षे थिएटर केल्यानंतर मी मुंबईत 2005 साली आलो.
- कोणीही गॉडफादर नसताना उराशी केवळ एक स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झालो. पण एक गोष्ट होती की माझ्यात आत्मविश्वास होता. 
- दोन वर्षे स्ट्रगल केल्यानंतर मला टीव्हीवर छोटीमोठी भूमिका मिळत असे. हे दोन वर्षे मी केवळ ऑडिशन दिल्या. 
- मी रोज सकाळी 10 वाजता ऑडिशन देण्यासाठी पोहचत असे त्यानंतर 12-12 तास मी रांगेत उभी राहत असे. पण तरीही मला यश मिळत नव्हते. असे दोन वर्षे चालले.

अशी मिळाली पहिली मालिका... 
- योगेशने सांगितले, ही जाहिरात मिळाल्यानंतर मला F.I.R मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. 6 वर्षे केलेल्या या मालिकेत मी 160 हून अधिक भूमिका केल्या. 
- मला या जाहिरातीतून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आणि आता मागे वळून बघण्याची काही गरज राहिली नाही. पण मला वाईट याचे वाटते की लोक माझ्या मालिकेतील व्यक्तिरेखेला ओळखतात पण मला नाही. पण मी हे आता मान्य केले आहे (हसत). 
- भाभीजी घर पर हैं या मालिकेने मला प्रसिद्धी मिळवून दिली. लोकांना माझी संवाद शैली पसंत पडली. मला बुंदेलखंडी भाषा अवगत होती. 
- योगायोगाने माझे लेखक अलीगढचे निघाले आणि आमची जुगलबंदी चांगली जुळली. 

पुढे बघा, 'दरोगा हप्पूसिंह' यांचे खास फोटोज आणि जाणून घ्या त्याच्याविषयी आणखी बरंच काही...   
 
बातम्या आणखी आहेत...