आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Boyfriend Rahul Withdrawn 24 Lacs Rupees From Pratyusha's Accounts

बॉयफ्रेंड राहुलने प्रत्युषाच्या खात्यातून काढले 24 लाख रु, फाडली सुसाइड नोट?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल राज सिंह आणि प्रत्युषा बॅनर्जी - Divya Marathi
राहुल राज सिंह आणि प्रत्युषा बॅनर्जी
मुंबई: प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणात नवीन वळण आले आहे. आतापर्यंत राहुल राज सिंहचे आई-वडील आरोप लावत होते, की प्रत्युषाच्या आई-वडिलांनी तिच्या खात्यातून 6 लाख रुपये काढले होते. आता प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुलव्दारा एका एक विशिष्ट काळात 24 लाख रुपये विड्रॉ केल्याचे समोर आले आहे. शिवाय, राहुलवर सुसाइड नोट फाडल्याचीसुध्दा शंका आहे.
अकाऊंट रिकामे, परंतु पैशांचा सुगावा नाही...
पोलिस सूत्रांच्या सांगण्यानुसार, प्रत्युषाच्या बँकच्या खात्यातून मागील वर्षी नोव्हेंबरपासून आतापर्यंत 24 लाख रुपये काढले आहेत.
- प्रत्युषाच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे, की तिच्या खात्यात आता एकही रुपया नाहीये. परंतु त्यांच्याकडे पैशांचा काही सुगावा नाहीये.
- पोलिसांचे म्हणणे आहे, की प्रत्युषाचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड राहुलकडे आहे.
- या प्रकरणात पोलिसांनी प्रत्युषाचे ज्या-ज्या बँकेत खाते होते, तिथे जाऊन चौकशी केली आहे. सध्या अकाऊंट स्टेटमेंटची स्टडी सुरु आहे.
राहुलला अटक करणार पोलिस?
- पोलिस सध्या राहुलच्या मेडिकल रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचे रिपोर्ट जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.
- त्याच आधारावर ठरवले जाईल, की राहुलला अटक करायची, की नाही.
- दुसरीकडे, राहुलने अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला आहे. मात्र मुंबई कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे.
- यादरम्यान कोर्टात सरकारी वकील दत्ता मुदिनगंती, डिफेन्स लॉयर जमीर खान आणि वकील फाल्गुनी ब्रह्मभट (प्रत्युषाची वकील) यांच्याशिवाय प्रत्युषाचे आई-वडील सोमा आणि शंकर बॅनर्जीसुध्दा उपस्थित होते.
- जज डॉक्टर ख्वाजा फारूक अहमद यांनी 20 मिनिटे युक्तिवाद ऐकला.
- यादरम्यान मुदिनगंती यांनी कोर्टात सांगितले, की पोलिसांना शोध लावाला, की प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राहुलले तिची सुसाइड नोट फाडली तर नसेल.
- डिफेन्स लॉयर जमीर खान म्हणाले, 'पोलिसांनी हे सांगितले नाही, की FIR दाखल करण्यासाठी इतका उशीर का लागला. प्रत्युषाच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर तिच्या आईने एका जबाबात राहुलला क्लिनचीट दिली होती. परंतु दुस-याच दिवशी त्यांची राहुलच्या विरोधात तक्रार दाखल केली. याचा अर्थ असा, की कुणीतरी त्यांना असे करण्यास सांगितले.'
खान म्हणाले, 'प्रत्युषाने बँकेतून खूप लोन घेतलेले होते. वर्षाच्या सुरुवातीला बँकेचे लोन रिकव्हरी एजेंट तिच्या घरी कार ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा राहुलने प्रत्युषाला वाचवले होते आणि सांगितले होते, की तो तिचे लोन भरेल.'
- प्रत्युषाची वकील फाल्गुनी ब्रह्मभट म्हणाली, 'प्रत्युषाचे आई-वडील आणि फ्रेंड्सच्या जबाबानुसार असे म्हटले जाऊ शकते, की ही घटना आत्महत्या नसून हत्या आहे.'
- 'प्रत्युषाच्या हत्येनंतर राहुलची वागणूक संशयास्पद होती. त्याने पोलिसांना फोन लावण्याऐवजी पूराव्यांसोबत छेडछाड केली. प्रत्युषा एक धाडसी मुलगी होती आणि ती बँकेचे लोन परत करू शकत नाही म्हणून आत्महत्या करणारी मुलगी नव्हती.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्युषा आणि राहुलचे PHOTOS...