Home »TV Guide» Is Jennifer Winget Being Paid Rs 1 Lakh Per Episode For Beyhadh

बाल्ड लूकमुळे वाढली या अॅक्ट्रेसची फीस, आता एका एपिसोडसाठी मिळणार एवढे पैसे

किरण जैन | Jul 14, 2017, 15:08 PM IST

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'बेहद' या मालिकेत अभिनेत्री जेनिफर विंगेट माया ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. मायामध्ये असलेला वेडेपणा तिने तिच्या भूमिकेतून अतिशय उत्कृष्टपणे सादर केला आहे. या मालिकेद्वारे जेनिफरने छोट्या पडद्यावर कमबॅक केले. या मालिकेमुळे तिच्या करियरला एक चांगले वळण मिळाले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. जेनिफर आता या मालिकेत प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मायाने टक्कल केलेले दिसणार आहे. जेनिफरने तिच्या या नव्या लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
बाल्ड लूकमुळे जेनिफरच्या मानधनात वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या मालिकेसाठी जेनिफरला प्रति एपिसोड 80 हजार रुपये मानधन मिळत होते. पण आता ही रक्कम वाढून एक लाख रुपये करण्यात आली आहे.

नव-याचा सूड उगवण्यासाठी मायाने केले टक्कल...
- 'बेहद'च्या प्रॉडक्शन हाऊसशी निगडीत एका सूत्राने सांगितले, "बेहद ही मालिका आता लीप घेणार आहे. माया आता पुन्हा एकदा सांझ (अनेरी वाजानी) आणि अर्जुन (कुशाल टंडन) यांच्या आयुष्यात परतणार आहे. आगामी एपिसोड्समध्ये माया एका आश्रमात साधूंसोबत राहताना दिसेल."
- "येणा-या दिवसांत मालिकेत मायाला स्मतीभ्रंश झालेले दिसणआर आहे. पण नव-याने तिला कसे जीवे मारण्याचा प्रयत्न केला, हे तिला स्मरण करुन दिले जाणार असून नव-याला धडा देण्यासाठी माया टक्कल करणार आहे."
पुढे वाचा, निर्मात्यांनी स्वतःहून वाढवले जेनिफरचे मानधन

Next Article

Recommended