आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Kapil New Vanity Van More Expensive Than The Ones Of SRK And Salman

शाहरुख-सलमानच्या नव्हे, हा आहे कपिल शर्माच्या व्हॅनिटी व्हॅनचा नजारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा सध्या बराच चर्चा आहे. मात्र यावेळी या चर्चेचे कारण त्याचा कॉमेडी नाइट्स विथ कपिल हा शो नाहीये, तर त्याची व्हॅनिटी व्हॅन आहे. अलीकडेच कपिलने नवीन व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे.
तसं पाहता, कपिलला व्हॅनिटी व्हॅन खरेदी करणे फार गरजेचे होते. कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये त्याने गोंधळ निर्माण केला होता. झालं असं होतं, की सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या ओपनिंग डेला कपिलला होस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र तेथे त्याला व्हॅनिटी व्हॅनची सुविधा उपलब्ध होऊ शकली नव्हती, त्यामुळे तो सीसीएलचा कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून निघून गेला होता.
असो, आता कपिलने अत्याधुनिक सुविधा असलेली व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. ही व्हॅनिटी व्हॅन सलमान-शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनच्या तोडीस तोड आहे. कपिलने आपल्या या नवीन व्हॅनिटी व्हॅनची खास छायाचित्रे फेसबूकवर पोस्ट केली आहेत. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दोन रुम आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कपिलच्या व्हॅनिटी व्हॅनसह इतर स्टार्सच्या व्हॅनिटी व्हॅनची खास झलक...
(ही सर्व छायाचित्रे कपिल शर्माच्या फेसबूकवरुन घेण्यात आली आहेत...)