आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RECALL: कपिल शर्माच्या भावाने सांगितले होते, ही होणार त्याची वहिनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- गिन्नी चतरथ आणि कपिल शर्मा)
मुंबई- मीडियामध्ये सध्या कॉमेडिअन कपिल शर्माच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा कपिल एक नवरदेवाच्या वेशभूषेतील एक फोटो लीक झाल्यामुळे सुरु आहे. परंतु अद्याप कपिल किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याच सदस्याने याविषयी पुष्टी दिलेली नाहीये, तसेच कपिलने कुणासोबत लग्न केले आहे, याचादेखील खुलासा झालेला नाहीये.
मागील वर्षी लग्न जमल्याच्या चर्चांना आले होते उधाण-
मागील वर्षी बातम्या आल्या होत्या, की कपिल 2014च्या अखेर लग्नागाठीत अडकणार. बातमी अशीही होती, की कपिलची बालपणीची मैत्रीण भवनीत चतरथ (गिन्नी) त्याची नववधू होणार आहे. स्वत: कपिलचा भाऊ अशोक शर्माने याविषयी संकेत दिले होते. divyamarathi.comसोबत बातचीत करताना त्याने सांगितले होते, 'कपिल जालंधरची भवनीत चतरथसोबत लग्न करणार आहे. तिला प्रेमाने गिन्नी म्हटले जाते. या जोडीने कॉमेडी शो 'हंस बलिए'मध्ये एकत्र काम केले होते. तो त्याचा 'बँक चोर' हा पहिला सिनेमा रिलीज झाल्यानंतर गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.'
मागील वर्षी कपिलने यशराज फिल्म्सचा 'बँक चोर' सिनेमा सोडला. त्यानंतर माध्यमांमध्ये त्याच्या लग्नाच्या चर्चा समोर यायला लागल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गिन्नी चतरथचे काही खास PHOTOS...