आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Item Girl Shefali Zariwala Ties The Knot With Actor Parag Tyagi

Pics: \'कांटा लगा...\' गर्ल शेफाली अडकली \'जोधा अकबर\' फेम शरीफुद्दीनसह लग्नगाठीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी)
मुंबई: 'कांटा लगा...' फेम आयटम गर्ल शेफाली जरीवाला लग्नगाठीत अडकली आहे. मंगळवारी (12 ऑगस्ट) तिने बॉयफ्रेंड पराग त्यागीसह ('जोधा अकबर'चा शरीफुद्दीन) कोर्ट मॅरेज केले आहे. शेफालीचे हे दुसरे लग्न आहे. काही दिवसांपासून शेफाली आणि पराग लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.
शेफालीने लग्नाविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले, 'मी आणि पगार मंगळवारी लग्नगाठीत अडकलो आहोत. माझ्यासाठी हा क्षण खूप आनंदाचा होता. परागने तीन वर्षांपूर्वी याच दिवशी लग्न करण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता. आज आम्ही लग्न केल्याचा मला खूप जास्त आनंद होत आहे. माझे कुटुंबीय दक्षिण अफ्रिकेत राहतात. तसेच परागचे नातेवाईक दिल्लीला राहतात. लग्नावेळी आम्ही दोघेच उपस्थित होतो. आमचे लग्न इतके लवकर उरकले, की आम्हाला एक फोटो काढायलादेखील वेळ मिळाला नाही. आमच्या ओळखीच्या लोकांना याविषयी कळाल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही लग्नाचे मोठे सेलिब्रेशन ठेवणार आहोत. मी परागसह नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे.'
याविषयी परागशी संपर्क साधण्यात आल्यानंतर त्याने सांगितले, 'तुम्हाला कसे ठाऊक आम्ही लग्न केले आहे. सध्या मी याविषयी जास्त काही सांगू शकत नाही. माझी शूटिंग असल्याने मी जरा व्यस्त आहे. त्यानंतर मी तुम्हाला सर्व काही सांगेन.'
कोण आहे शेफाली जरीवाला?
शेफाली जरीवाला 2002मध्ये 'कांटा लगा...' व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत आली होती. या व्हिडिओमध्ये ती आयटम गर्लच्या रुपात दिसली होती. याशिवाय 2004मध्ये आलेल्या 'मुझसे शादी करोगी'मध्ये 'बिजली'चे पात्र साकारून ती पुन्हा एकदा समोर आली होती. या सिनेमात तिने सलमान खान आणि अक्षय कुमारसह काम केले होते. शेफालीचा हा आतापर्यंतचा पहिला आणि शेवटचा सिनेमा आहे. शेफाली सध्या टीव्ही स्टार म्हणून ओळखली जाते. 'बूगी वूगी' या डान्सिंग शोमध्ये तिने स्पर्धक म्हणून परफॉर्मन्स दिले आहेत. तिचा 'नच-बलिये 6' हा तिचा शेटवचा टीव्ही शो आहे. त्यानंतर ती कोणत्या मालिकेत किंवा शोमध्ये दिसली नाही.
दुस-यांचा थाटला संसार
शेफालीचे पहिले लग्न गायक हरमीत गुलजारसह (मीत ब्रदर्स फेम) झाले होते. परंतु 2009मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. स्वत: शेफालीने घटस्फोटाविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले होते, की ती आणि हरमीत विभक्त झाले आहे. 2012मध्ये शेफालीने सांगितले होते, की ती झी टीव्हीच्या 'पवित्र रिश्ता'मध्ये अर्चनाच्या भावाचे पात्र साकारणारा अभिनेता पराग त्यागीला डेट करायला लागली होती. मंगळवारी दोघांनी आपल्या अफेअरला लग्नात रुपांरित केले आहे. पराग सध्या 'जोधा अकबर'मध्ये शरीफुद्दीन हुसैनची भूमिका साकारत आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शेफालीची परागसह काही छायाचित्रे...