आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVवर फ्लॉप ठरले अनिल कपूर, जॅकलिनही पडली फिकी, 'भाभीजी'ही रेसमधून बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल कपूर पॉलिटिकल आणि थ्रिलर शो '24' मधून छोट्या पडद्यावर आला होता. आता या मालिकेला दोन आठवडे होऊन गेले तरी ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही, असे दिसते. नुकत्याच एका खासगी कंपनीने केलेल्या सर्व्हेमधून ही मालिका टॉप- 20 मध्येही नसल्याचे समजले. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा सेलिब्रिटी डान्स शोसुद्धा टीआरपी रेटिंगमध्ये मागे पडला आहे.
'24' या मूळच्या अमेरिकन मालिकेचे सध्या तेथे नववा सीझन सुरू आहे. तेथील प्रेक्षकांनी ती मालिका डोक्यावर घेतली आहे. भारतात मात्र ती प्रेक्षकांनी नाकारली. बोल्डनेस, ग्लॅमर, तडका असा सगळा मसाला वापरला तरी ती यशस्वी झाली नाही. सेलिब्रिटी डान्स शो असलेल्या 'झलक दिखला जा'चेही असेच हाल आहेत. जॅकलिन, करण जोहर, मनीष पॉल असे सेलिब्रिटीज असूनही ही मालिका प्रेक्षक जोडू शकली नाही. पहिल्या सीझनच्या अपयशानंतरही अनिलने '२४'चा दुसरा सीझन केला, हे विशेष!
पुढे वाचा, भाभीजीही रेसमधून बाहेर...
बातम्या आणखी आहेत...