आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jai Jai Bajrangbali Serial Actress Harmanpreet Kaur In Patiala

टीव्ही अभिनेत्रीने उघड केले कास्टिंग काउचचे सत्य, म्हणाली - 'दलाल उचलतात फायदा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पटियाला येथे पोहोचलेली 'जय जय बजरंग बली' मालिकेतील अभिनेत्री हरमनप्रीत कौर)
पटियाला : 'जय जय बजरंग बली' या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणा-या अभिनेत्री हरमनप्रीत कौर हिने बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच होत असल्याचे स्वीकार केले. हरमनप्रीतने दिलेल्या माहितीनुसार, कास्टिंग काउच प्रकरणात नावाजलेल्या दिग्दर्शक किंवा अभिनेत्यांचा समावेश नसतो. केवळ मध्यस्थी करणारे, दलाल अभिनय क्षेत्रात संघर्ष करणा-या तरुणींचा फायदा उचलतात. इंडस्ट्रीत ज्यांना गॉडफादर नाहीये, अशा तरुणींच्या शोधात ते असतात. हा प्रकार टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे तरुणींना याला काटेकोरपणे नकार देणे होये. जे लोक कास्टिंग काउच प्रकरणात सामील असतात, ते इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठू शकत नाहीत.
हरमनप्रीत कौर मुळची पटियालाची असून अलीकडेच ती येथे आली होती. आता कामाच्या निमित्ताने हरमनप्रीत मुंबईत स्थायिक झाली आहे.
पटियालात रंगभूमीवर केलेल्या कामाचा अनुभव आला कामी...
इंडस्ट्रीतील काही लोकांना मी माझे प्रोफाइल पाठवले होते. एकेदिवशी जय जय बजरंग बली या मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसमधून मला फोन आला. येथे बरेच जण ऑडीशनसाठी आले होते. येथे मला संधी मिळेल, अशी आशा मला होती. अगदी तसेच झाले. सध्या मी 'पलटन' आणि 'जय जय बजरंग बली' या मालिकांमध्ये काम करत आहे. मालिकेत काम करताना पटियालात रंगभूमीवर केलेल्या कामाचा अनुभव माझ्या कामी आला. आणखी काही प्रोजेक्टवर बोलणी सुरु असून लवकरच मी नवीन मालिकांमध्ये झळकणार आहे.
मायानगरीत मिस करते शाही शहरातील पराठे
मुंबईत मी आपल्या घराला खूप मिस करते. तेथील वडापावची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. मात्र मला पटियालात तयार होणारे पराठे तेथे दिसत नाहीत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हरमनप्रीत कौरची खास छायाचित्रे...