आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jai Malhar Fame Actress Isha Keskar In Hindi Film

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'जय मल्हार\'च्या बानूला मिळाला मोठा ब्रेक, हिंदीत झळकणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('जय मल्हार' मालिकेतील एका दृष्यात अभिनेत्री इशा केसकर)

'मंगलाष्टक वन्स मोअर', 'हॅलो नंदन', 'वी आर ऑन आता होऊन जाऊ द्या' या मराठी सिनेमांमध्ये झळकलेली आणि आता 'जय मल्हार' मालिकेमध्ये बानूच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे इशा केसकर. आता इशाला तिच्या करिअरमधील मोठी संधी मिळाली आहे. आगामी 'सीआरडी' या हिंदी सिनेमात इशा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. आजची तरुणाई, त्यांचं जग यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमात इशाने आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका साकारली आहे.
मराठी दिग्दर्शिका क्रांती कानडे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमासाठी ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर डॅनिअल केत्झ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून हॉलिवूडच्या आणखीही काही तंत्रज्ञांनी यासाठी काम केले आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातसुद्धा हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे समजते.
महाविद्यालयीन काळापासून इशा कॉलेजांच्या एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत होती. त्यानंतर पुण्यात अनेक प्रायोगिक नाटकांमधून तिने काम केले. नाटक, मराठी सिनेमा आणि मालिकेनंतर इशा आता हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची चुणुक दाखवणार आहे. या भूमिकेसाठी रीतसर ऑडिशन दिल्यानंतर तिची निवड झाली. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बानू अर्थातच इशाची ग्लॅमरस छायाचित्रे...