आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जमाई राजा'च्या या बोल्ड अॅक्ट्रेसच्या व्हिडिओवर यूजर्सचे टोमणे, म्हणाले - पोर्न इंडस्ट्री निघून जा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'जमाई राजा' फेम अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे. सोमवारी तिने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला, यामध्ये निया बोल्ड रुपात सेक्सी डान्स मुव्स करताना दिसतेय. या व्हिडिओला 1 लाख 70 हजारांहून अधिक वेळा बघितले गेले आणि हजाराहून अधिक कमेंट्स मिळाले आहेत. नियाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी व्हिडिओ  Cheap असल्याचे सांगत तो सोशल मीडियावरुन डिलीट करण्याचा सल्ला नियाला दिला. इतकेच नाही तर काही युजर्सनी चक्क नियाला पोर्न इंडस्ट्रीत निघून जायला सांगितले आहे.  

'जमाई राजा'मुळे आली प्रसिद्धीझोतात
- 2014 ते 2016 याकाळात 'जमाई राजा' या मालिकेत झळकलेल्या निया शर्माला खरी ओळख या मालिकेतील 'रोशनी' या व्यक्तिरेखेतून मिळाली.
-  2016 मध्ये नियाने ही मालिका सोडली. या मालिकेपूर्वी ती 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेत क्रिस्टल डिसूजाच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती.   
- रिपोर्ट्सनुसार, निया शर्मा लवकरच कलर्स चॅनलवर नव्याने दाखल होणा-या चंद्रकांता या मालिकेत लीड रोल साकारताना दिसणारेय. 
- एकता कपूरने नियाला 'चंद्रकांता' या मालिकेतील लीड रोलसाठी फायनल केले आहे. अद्याप याची अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही.  
- डिसेंबर 2016 मध्ये निया शर्माला आशियातील तिसरी सेक्सी महिलेचा किताब मिळाला आहे. 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, निया शर्माच्या व्हिडिओवर आलेल्या फॅन्सच्या Reaction...
बातम्या आणखी आहेत...