आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहिहंडी उत्सवात टीव्ही अभिनेत्रींनी धरला ताल, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायानगरी मुंबईत प्रत्येकच सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र गोकुळाष्टमीची क्रेज काही वेगळीच आहे. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे दहिहंडी स्पर्धा. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांत स्मॉल आणि बिग स्क्रिनवरील सेलिब्रिटींना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमांत स्मॉल स्क्रिनवरच्या अभिनेत्रींनी ठुमके लावून उपस्थितांचे मनोरंजन केले. यामध्ये कविता कौशिक (एफआयआर - मालिका), करिश्मा तन्ना (ग्रॅण्ड मस्ती - सिनेमा), आयटम गर्ल नताशा (सत्याग्रह - सिनेमा) आणि प्रियांका शेट्टी या अभिनेत्रींनी परफॉर्म केले.
याशिवाय बीजेपीचे चीफ सेक्रेटरी सुनील राणे यांनी आयोजित केलेल्या दहिहंडीच्या कार्यक्रमात स्पेनिश बॅले डान्सर्सनीही परफॉर्म केले. यावरुन त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. गोकुळाष्टमीच्या सणात बॅले डान्सर्सचा परफॉर्मन्स योग्य नसल्याचे काही जणांचे म्हणणे होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघा दहिहंडीच्या दिवशी सेलेब्सनी सादर केलेल्या परफॉर्मन्सची खास झलक...