आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझी टीव्हीवरील 'सारेगामापा- 2012' या सांगितिक रिअॅलिटी शोमध्ये पुण्याच्या जसराज जोशीने बाजी मारली आहे. पुण्याचा जसराज जोशी, लुधियानाचा शेहनाझ अख्तर, मुंबईचा विश्वजित बोरवणकर आणि जयपूरचा महंमद अमन खान यांच्यात अंतिम चुरस रंगली. एकापेक्षा एक तगडे स्पर्धक असलेल्या या शोच्या अंतिम फेरीत जबरदस्त परफॉर्मन्स देत जसराज जोशीने विजेतेपदाचा मान पटकावला. जसराजला ट्रॉफी, हिरो होंडा बाईक आणि झी टीव्हीबरोबर एक वर्षांचा करार असे बक्षीस देण्यात आले आहे.
अंधेरी येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सिनेमा आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
जसराज शास्त्रीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही संगीत शास्त्रात पारंगत आहे. सारेगमपच्या मंचावर त्याने अनेकदा फ्युजनचा प्रयोग केला आहे. त्यामुळे संगीतातला नवा प्रकार प्रेक्षकांसमोर आला आणि पसंतीसही पडला.
अंतिम फेरीत शोचा अँकर जावेद अलीसह जय भानुशाली आणि कपिल शर्मा यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
या ग्रँड फिनालेची खास झलक बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.