आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jay Bhanushali And Mahi Vij Re Wedding At Las Vegas

टीव्हीची फेमस जोडी जय-माहीने पुन्हा थाटले लग्न, पाहा खासगी PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध जोडी जय भानूशाली आणि माही विजने पुनर्विवाह केल्याची बातमी आहे. या दोघांनी लास वेगासमधील एका चर्चमध्ये लग्न केले. काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा लग्न करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
या दोघांविषयी मीडियात बातमी होती, की हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. मात्र अलीकडेच माहीने तिच्या फेसबूकच्या माध्यमातून या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला. माहीने फेसबूकवर लिहिले, ''डी डे टॉम जय आणि मी लास वेगासमधील एका चर्चमध्ये पुन्हा लग्न केले. लास वेगासमध्ये मी माझ्या नव-यासोबतच पुन्हा लग्न केले, जय
भानुशाली लव्ह यू फॉरएव्हर...''
जय आणि माहीने यापूर्वी 2011मध्ये गुपचुप लग्न केले होते. लग्नाच्या ब-याच दिवसांनी त्यांनी आपल्या लग्नाविषयी सांगितले होते. असो, दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्यांना पुर्णविराम लागावा, यासाठी तर जय आणि माहीने पुन्हा लग्न केले असावे, असेही म्हटले जात आहे.
कोण आहे जय भानुशाली...
जय भानुशाली टीव्ही अभिनेता असून एकता कपूरच्या कयामत या मालिकेत लीड रोलमध्ये झळकला होता. याशिवाय जयला डान्स इंडिया डान्सच्या सूत्रसंचालकाच्या रुपातही ओळखले जाते. झलक दिखला जा 2 आणि नच बलिये 5मध्ये जय स्पर्धक म्हणून झळकला होता. मॉडेलिंग, अॅक्टिंग, डान्सिंग आणि अँकरिंगमध्ये जय माहिर आहे. 25 ऑक्टोबर 1984 रोजी जन्मलेला जय कयामतशिवाय गीत हुई सबसे पराई, किस देश में है मेरा दिल, कैरी रिश्ता खट्टा मीठा या मालिकांमध्येही झळकला आहे.
कोण आहे माही विज...
मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या माहीचा जन्म दिल्लीत झाला होता. 'अकेला'(2007-2008), 'कैसी लागी लगन' (2008-2009) आणि 'लागी तुझसे लगन' (2009-2012) या मालिकांमध्ये माही झळकली आहे. याशिवाय 'झलक दिखला जा-4' आणि 'नच बलिए-5'मध्ये माहीने आपल्या डान्सचा जलवा दाखवला होता. याशिवाय माही प्रसिद्ध अभिनेता ममूटीसह अपरचितन (2004) या मल्याळम सिनेमातही झळकली होती. 'खतरों के खिलाड़ी-5' या शोमध्येही माही सहभागी झाली होती. मात्र पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिने हा शो अर्धवट सोडला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या जोडीची खास छायाचित्रे...