आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jay Bhanushali And Mahi Wins Nach Baliyee Season 5

जय-माही ठरले 'नच बलिये-5'चे विजेते, 50 लाख रुपयांचे बक्षिसही मिळाले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्‍हीवर रियालिटी डांस शो 'नच बलिये' जय भानुशाली आणि मा‍ही विज या जोडीने जिंकला आहे. 'नच बलिये'च्‍या 'सिझन-5'मध्‍ये या जोडीने डांसचे धमाल परफॉर्मन्‍सेस दिले. चाहत्‍यांनीही त्‍यांनाच पसंती दिली. पुरस्‍काराची रक्कम म्‍हणून दोघांना 50 लाख रुपये रोख देण्‍यात आले.

'नच बलिये-5'मध्‍ये जजेस म्‍हणून शिल्‍पा शेट्टी, टेरेंस लिविस आणि साजिद खान यांचा सहभाग होता. या हंगामाची सुरुवात 29 डिसेंबरला झाली होती. त्‍यात टेलिव्‍हीजन क्षेत्रातील 11 प्रसिद्ध जोड्यांनी सहभाग घेतला होता. जय आणि माहीला सर्वाधिक 50 लाख मतं मिळाली.

ग्रँड फिनालेमध्‍ये शिल्‍पा शेट्टीनेही अप्रतिम परफॉर्मन्‍स दिला. तिने जवळपास 3 वर्षांनी एखाद्या शोमध्‍ये डांस परफॉर्मन्‍स दिला आहे.

या स्‍पर्धेत रवि दुबे आणि सरगुन मेहता रनर अप ठरले.