आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा अॅक्टर करतोय 'चौथे' लग्न, जाणून घ्या पहिल्या 3 पत्नी कोण होत्या?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7 जुलैला लखनौमध्ये जीतू शिवहरेचा श्वेता जयस्वालसोबत साखरपुडा झाला. - Divya Marathi
7 जुलैला लखनौमध्ये जीतू शिवहरेचा श्वेता जयस्वालसोबत साखरपुडा झाला.
आग्रा: 'चिडियाघर' या कॉमेडी शोमधील लोकप्रिय कॅरेक्टर 'गधा प्रसाद' साकारणारा जीतू शिवहरे ख-या आयुष्यात चौथ्यांदा लग्नगाठीत अडकणार आहे. त्याच्या चौथ्या लग्नाने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. आधी जीतूने चौथ्या लग्नाची घोषणा केली आणि त्यानंतर सत्य उघडकिस आणले.
लखनौमध्ये शूटिंगदरम्यान झाली भेट...
- मूळचा आग्र्याचा जीतू शिवहरे अलीकडेच शूटिंगनिमित्त लखनौमध्ये आला होता.
- येथेच शूटिंग सेटवर त्याच्या एका मित्राने त्याला एका तरुणीचा फोटो दाखवला.
- जीतूने सांगितले, 'माझा मित्र कुंडली जुळवण्यात एक्सपर्ट आहे. त्याने मला श्वेताचा फोटो दाखवला आणि माझी कुंडली तिच्या कुंडलीशी जुळवली. गुण जुळले आणि माझ्या आई-वडिलांकडे प्रपोजल पाठवले.'
- जीतूला श्वेतावर पहिल्याच नजरेत प्रेम झाले होते.
- त्याच्या आई-वडिलांनीसुध्दा मुलीचा फोटो आणि कुंडली पाहून होकार दिला.
- 7 जुलैला दोघांचा लखनौमध्ये साखरपुडा झाला.
- जीतू शिवहरेची भावी पत्नी श्वेता जयस्वाल लखनौची रहिवासी आहे.
- दोघांचे लग्न 13 जुलैला शिर्डीमध्ये होणार असून 1 ऑगस्टला आग्राला ग्रँड रिसेप्शन दिले जाणार आहे.
काय झाले पहिल्या 3 पत्नीचे...
- जीतूने रहस्य उलगडताना सांगितले, 'माझे पहिले 3 लग्न रील लाइफमध्ये झाले होते. ख-या आयुष्यात पहिल्यांदाच बोहल्यावर चढणार आहे.'
- त्याच्या होणा-या सास-यांचासुध्दा असाच गोंधळ उडाला होता. त्यांना संशय आला होता, की जीतू खरंच लग्न झालेले आहे.
- गधा प्रसादने सांगितले, 'माझे सासरे मला विचारत होते, 'तुझे 3 लग्न झाल्याची बातमी वाचली मी. हे काय प्रकरण आहे?'' मी त्यांना स्पष्ट सांगितले, माझे पहिले तीन लग्न टीव्ही मालिकांमध्ये झाले होते. त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी या नात्याला होकार दिला.
अजय देवगणसोबत केले आहे सिनेमात काम...
- जीतू सब टीव्हीवरील 'चिडियाघर' मालिकेतील 'गधा प्रसाद' भूमिकेने लोकप्रिय झाला.
- त्याने बॉलिवूडमध्येसुध्दा काम केले आहे.
- त्याने 'अतिथी कब जाओगे' सिनेमात अजय देवगणसोबत काम केले होते.
- आता तो नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'बाबा मोशाय' सिनेमात काम करत आहे. हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.
- शिवाय तो ऑक्टोबरमध्ये लाइफ ओके चॅनलच्या एका नवीन कॉमेडी शोमध्ये झळकणार आहे.
सलमानला विचारला होता लग्नाविषयी प्रश्न...
- जीतूने सांगितले, 'बाबू मोशाय' सिनेमात नवाजुद्दीनच्या पोलिस मित्राच्या भूमिकेत आहे.
- अलीकडेच मुंबईमध्ये झालेल्या एका फंक्शनचा किस्सा सांगताना जीतू म्हणाला, 'मी नवाजसोबत तिथे गेलो होतो. तिथे मला सलमान खान भेटला.'
- मी मजाकमध्ये त्याला विचारले, 'भाई मी लग्न करतोय, तुम्हीही करून घ्या.' यावर सलमान म्हणाला, 'आधी तू कर, मी नंतर करतो.' जीतूने हसून सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'गधा प्रसाद'चे रील आणि रिअल लाइफमधील PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...