आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jennifer Winget May Play A Muslim Character In Gul Khan’S Next

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करणच्या पावलावर पाऊल ठेवत जेनिफरही आता निभावणार मुस्लिम मुलीची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेत्री जेनिफर विंगेट)
टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच येणाऱ्या 'हमसफर' या नवीन मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेत ती एका मुस्लिम मुलीची भूमिका करणार आहे.
सध्या सोनी टीव्ही सहा नवीन मालिकांवर काम करत आहे, 'हमसफर' ही त्यापैकीच एक आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेची कथा मुस्लिम पार्श्वभूमीवर आधारित आहे. मालिकेत आग्रा येथे राहणारी एक मुलगी फॅशन डिझायनर होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईला येते. ही तीन बहिणींची कथा आहे ज्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या वडिलांनी सोडून दिलेले असते. या मालिकेतील मुख्य पात्र पुरूषांचा तिरस्कार करत असते. ती खुप महत्वाकांक्षी असते आणि आपल्या रागावर ताबा ठेवण्यासाठी ती अँगर कंट्रोल थेरपीदेखील घेत असते.
बातम्यांनुसार, या मालिकेत लीड एक्ट्रेसच्या भूमिकेसाठी अनेक मुलींच्या ऑडीशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यात काही नवीन तर काही अनुभवी चेहऱ्यांचा समावेश होता. परंतू जेनिफरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सूत्रांच्या मते, निर्मात्यांना जेनिफरचा मुस्लिम लूक बराच आवडला आहे. गुल खान या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार आहे. गुलने याआधीदेखील ‘कुबूल है’या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे, ज्यात जेनिफरचा नवरा करण सिंग ग्रोव्हर मुख्य भूमिकेत होता.