आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jhalak Dikhhla Jaa 7: Sophie Choudry Kisses Salman Khan!

'झलक दिखला जा'च्या सेटवर सोफीने केले सलमानला KISS, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('झलक दिखला जा'च्या सेटवर सलमान खानला किस करताना अभिनेत्री सोफी चौधरी)
मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या आपल्या आगामी 'किक' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तो अलीकडेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर आला होता. येथे अभिनेत्री आणि शोची स्पर्धक सोफी चौधरीने सलमानची गळाभेट घेत त्याचे चुंबन घेतले.
यावेळी सोफीने आपल्या सादरीकरणानंतर सलमानकडे एक गाणे गाण्याची विनंती केली. सलमानने तिची ही विनंती मान्य केली. मात्र आपल्यासह तिलासुद्धा गाणे गाण्याची ऑफर दिली. या गाण्यानंतर सोफीने सलमानला किस केले.
या शोमध्ये सलमानने किकमधील त्याची को-स्टार जॅकलीन फर्नांडिस आणि परीक्षक रेमो डिसुजासह पोळी बनवल्या. सलमानला पोळी लाटताना पाहून शोमधील सर्व स्पर्धक खूप आनंदी झाले. त्यांनी सलमानसह बरीच धमालमस्तीसुद्धा केली.
सलमानची प्रमुख भूमिका असलेला 'किक' हा सिनेमा येत्या 25 जुलै रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात सलमानसह जॅकलीन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'झलक दिखला जा'च्या सेटवर पोहोचलेल्या सलमानची खास छायाचित्रे...