वरील छायाचित्र पाहून अचंबित झालात ना. पलकसह तिच्यासारखीच दिसणारी ही दुसरी युवती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जरा निरखून बघा. ही युवती दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आहे. आगामी 'बॉबी जासूस' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी विद्या 'झलक दिखला जा'च्या सेटवर रुप पालटून पोहोचली होती. या रुपात तिला बघून उपस्थित सर्व चकित झाले होते. यावेळी विद्याने पलकसह भरपूर धमाल-मस्ती केली.
विद्याची प्रमुख भूमिका असलेला 'बॉबी जासूस' हा सिनेमा येत्या 4 जुलै रोजी रिलीज होत असून या सिनेमात विद्या बारा वेगवेगळ्या रुपात झळकणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'झलक दिखला जा'च्या सेटवर क्लिक झालेली विद्या आणि शोच्या परीक्षकांची खास छायाचित्रे...
(फोटो - डावीकडून पलक उर्फ किकू शारदा आणि अभिनेत्री विद्या बालन)