आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jhalak Dikhhla Jaa 7 Winner's Photo Revealed On Social Media

आशिष ठरला 'झलक दिखला जा-7'चा विजेता, FINALEपूर्वी लीक झाले छायाचित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('झलक दिखला जा-7'च्या सेटवर विनिंग ट्रॉफीसोबत आशिष शर्मा, शेजारी जजेस आणि इतर
स्पर्धक)
मुंबईः 'झलक दिखला जा-7' या डान्सिंग रिअॅलिटी शोचा ग्रॅण्ड फिनाले शनिवारी रंगणार आहे.
मात्र ग्रॅण्ड फिनालेपूर्वीच विजेत्याचे नाव उघड झाले आहे. सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर 'झलक...'च्या सेटवरील एक छायाचित्र शेअर होत आहे. त्यामध्ये रंगरसिया फेम टीव्ही अभिनेता आशिष शर्मा विनिंग ट्रॉफीसोबत दिसत आहे. लोक त्याला शुभेच्छा देत आहेत.
फिनालेमध्ये आशिष शर्मा, करण टैकर, शक्ति मोहन आणि मोनी रॉय यांच्यात अंतिम लढत होणार आहे. 16 आठवड्यांच्या कठीण परिश्रमानंतर आशिष शर्माने सर्व स्पर्धकांना मागे टाकत या पर्वाचे विजेतेपद आपल्या नावी केले आहे. प्रेक्षकांना शनिवारी (20 सप्टेंबर) रात्री 9 वाजता 'झलक...'चा ग्रॅण्ड फिनाले बघायला मिळणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'झलक...'मधील आशिष शर्माच्या निवडक सादरीकरणाची छायाचित्रे...