आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendra And Tusshar Kapoor On 'Comedy Nights With Kapil'

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये जितेंद्र-तुषारची सुपर धमाल, बघा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिअॅलिटी शोजमध्ये सेलिब्रिटी आपल्या सिनेमांच्या प्रमोशनच्या निमित्ताने हजेरी लावत असतात. मात्र यावेळी कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या लोकप्रिय शोमध्ये असे घडले नाही. म्हणजेच सेलिब्रिटी शोमध्ये आले खरे, मात्र एखाद्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नव्हे, तर प्रेक्षकांना पोटधरुन हसवायला. होय, कपिलच्या या शोमध्ये अलीकडेच अभिनेते जितेंद्र त्यांचा मुलगा तुषार कपूरसह सहभागी झाले होते. मात्र ते सिनेमाच्या प्रमोशनसाठी येथे आले नव्हते. जितेंद्र आणि तुषार कपूर स्पेशल 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'चा हा एपिसोड येत्या एप्रिल महिन्यात टेलिकास्ट केला जाणार आहे.
सांगितले जाते, की कपिलने स्वतः जितेंद्र आणि तुषारला या शोमध्ये आमंत्रित केले. क्षणाचाही विलंब न लावता दोघांनीही कपिलचे आमंत्रण स्वीकारले आणि धमाल करण्यासाठी शोच्या सेटवर पोहोचले.
यावेळी अभिनेते जितेंद्र मस्तीच्या मूडमध्ये दिसले. जितेंद्र यांनी तुषारसह मिळून केवळ धमालच केली नाही, तर चक्क तालही धरला. यावेळी दोघांनी प्रेक्षकांसोबत संवादसुद्धा साधला.
जितेंद्र यांची कन्या एकता कपूर काही दिवसांपूर्वी 'रागिनी एमएमएस 2' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिच्यासह सनी लियोन हजर होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये सहभागी झालेल्या जितेंद्र आणि तुषार यांची खास छायाचित्रे...