आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jodha Akbar Stars Rajat Tokas, Chetan Hansraj, Lavina Tandon’S Real Avatars

PHOTOS : बघा 'जोधा अकबर' मालिकेतील कलाकारांचा रिअल लाईफ अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरच्या मालिकांच्या मांदियाळीतील सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'जोधा अकबर'. बालाजी टेलिफिल्म्सची निर्मिती असेलल्या या मालिकेतील कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने मालिकेला यशस्वी बनवले आहे. झी टीव्हीवर प्रसारित होणा-या या मालिकेत रजत टोकस आणि परिधि शर्मा मेन लीडमध्ये आहेत.
'जोधा अकबर'मध्ये अकबरची भूमिका साकारणारा अभिनेता रजत टोकस यापूर्वी 'पृथ्वीराज चौहान' या मालिकेत शीर्षक भूमिकेत झळकला होता. तर परिधी शर्मा एका राजपूत राजकुमारीची भूमिका उत्कृष्टरित्या पेलत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर हे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीला पडले आहेत.
या मालिकेत अकबरची पहिली पत्नी रुकइयाची भूमिका साकारणारी लवीना टंडनसुद्धा आपल्या अभिनयाने कौतुकास पात्र ठरली आहे. दुष्ट महामंगाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी काळसेकर आणि तिच्या ऑनस्क्रिन मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता चेतन हंसराज यांचाही ही मालिका यशस्वी बनवण्यात मोलाचा वाटा आहे.
या मालिकेतील तुमचे हे लाडके कलाकार नेहमी मुघल वेशभुषेत आणि दागिन्यांमध्ये नटलेले दिसतात. मात्र ख-या आयुष्यात ते कसे दिसतात हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला असेलच ना... चला तर मग या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या कलाकारांचे पडद्यावरचे नव्हे तर पडद्यामागचे रुप दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रिअल लाईफमध्ये कसे दिसतात हे कलाकार...