आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jodha Akbar : Was Paridhi Aka Jodha Sexually Harassed On The Sets?

सेटवर झाले परिधीचे लैंगिक शोषण, म्हणून शो सोडण्याचा घेतला निर्णय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अलीकडेच बातमी आली आहे, की झी टीव्हीवरील 'जोधा अकबर' या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित मालिकेत जोधाची भूमिका साकाराणारी अभिनेत्री परिधी शर्माने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही जणांच्या मते, हा एक पब्लिसिटी स्टंट आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे.
सूत्रांनी divyamarathi.comला दिलेल्या माहितीनुसार, परिधीने ही मालिका सोडण्याच्या निर्णयामागे अनेक कारणे आहेत. सेटवर परिधीचे लैंगिक शोषण होत असल्याचे समोर आले आहे. या मालिकेचा दिग्दर्शक संतराम वर्माच परिधीचे लैंगिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
सेटवरील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की दिग्दर्शकामुळे परिधीला शुटिंगदरम्यान ब-याच अडचणींचा सामना करावा लागतो. खरं तर मालिकेची लोकप्रियता बघता मालिका सोडण्याची परिधीची इच्छा नव्हती. मात्र दिग्दर्शकाने केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे तिला नाईलाजास्तव मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतोय.
सूत्रांनी खुलासा केला, की संतरामच्या वागण्याला कंटाळून परिधीने प्रॉडक्शन टीमकडे याविषयी तक्रार केली. मात्र तिला कुणाचीही मदत मिळाली नाही. संतराम वर्माने यापूर्वी 'श्श्श...कोई है' ही मालिका दिग्दर्शित केली होती. तो बालजी प्रॉडक्शनच्या खूप जवळ आहे. त्यामुळे कदाचित प्रॉडक्शन हाऊसमधील कुणीही त्याच्याविरोधात बोलण्यास धजावले नाही. अखेर परिधीने मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, संतरामवर यापूर्वीही लागले होते असे आरोप, काय म्हणते परिधी याविषयी...