आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉनला पाहून KBCच्या या स्पर्धकाच्या आनंदाला उरला नाही पारावार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'कौन बनेगा करोडपती'च्या सातव्या पर्वात छत्तीसगढच्या सुषमा मिश्राला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. सुषमा या पर्वातील दुसरी स्पर्धक होती. तिने बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना एक तुतारी भेट स्वरुपात दिली. बच्चन साहेबांनी तुतारी वाजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

सुषमाने बिग बींना सांगितले, की ती बॉलिवूडचा हंक जॉन अब्राहमची मोठी चाहती आहे. याशिवाय संधी मिळाल्यास त्याला भेटण्याची तिने इच्छाही व्यक्त केली. सुषमाची ही इच्छा कळल्यानंतर बिग बींनी जॉन अब्राहमला केबीसीच्या सेटवर बोलावून घेतले.

झाले असे, की केबीसीचा सेट यशराज स्टुडिओमध्ये लावण्यात आला होता. येथून थोड्याच अंतरावर जॉन आपल्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत होता. आता खुद्द बिग बींनीच बोलावणे पाठवले आहे म्हटल्यावर जॉन जर आला नसता तरच नवल.