आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुही-सचिनच्या घरी झाले नन्ही परीचे आगमन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील 'कुमकुम' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या जुही परमार आणि अभिनेता सचिन श्रॉफ या जोडप्याच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले. 26 जानेवारीला जुहीने गोंडस बाळाला जन्म दिला.

याची माहिती जुहीची मैत्रीण पूजा बेदीने ट्विटरच्या माध्यमातून दिली. पूजा बेदीने ट्विट केले की, ''जुहीने बेबी गर्लला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. जुही या क्षणाचा आनंद लुटतेय.''

जुही परमारने छोट्या पडद्यावरील कुमकुम, देवी, रिश्ते, विरासत या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये विनर ठरली होती. तर सचिन श्रॉफ सध्या 'बालिका वधू' या मालिकेत दिसत आहे.