आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुमकुम'ने शेअर केले मुलीबरोबरचे Photos, शो साठी घटवले होते 17 kg वजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी समायरासह जुही परमार. - Divya Marathi
मुलगी समायरासह जुही परमार.
मुंबई - 'कुमकुम- एक प्यारा सा बंधन' या प्रसिद्ध मालिकेतून (2002-2009) 'कुमकुम' च्या भूमिकेद्वारे घराघरात पोहोचलेली जुही परमार सध्या कलर्स वाहिनीच्या 'शनि' मालिकेत शनिच्या आईच्या भूमिकेत आहे. जुहीने या शोसाठी 17 किलो वजन घटवले होते. नुकतेच तिने मुलगी समायरा बरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघी मायलेकी खास पोज देताना दिसत आहेत. जुही 2013 नंतर कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही. तिने मुलगी समायराच्या जन्मानंतर ब्रेक घेतला होता. 

मुलीला देते संपूर्ण वेळ.. 
नवीन शोद्वारे टिव्हीवर पुनरागमन करूनही जुही तिच्या मुलीला पूर्ण वेळ देते. तिने मुलीबरोबरचे काही नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले.. 'My super poser..beats me hands down..'. दुसऱ्या एका फोटोबरोबर तिने पोस्ट केले, 'We love to pout n love to party..like mamma like baby..' 

जूही ने 2009 मध्ये टिव्हीस्टार सचिन श्रॉफबरोबर लग्न केले होते. 27 जानेवारी 2013 ला तिने मुलगी समायराला जन्म दिला. त्यानंतर ती ग्लॅमर जगतापासून दूर होती. 2015 मध्ये तिने संतोषी माँ मालिकेद्वारे पुनरागमन केले. त्यानंतर 2016 पासून ती 'शनि' मालिकेत अभिनय करत आहे. काही रियालिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. ती 'नच बलिए-3' (2007), 'कॉमेडी सर्कस-2' (2008), 'बिग बॉस-5' ( 2011-12) सह इतर अनेक रियालिटी शोमध्ये स्पर्धक होती.  

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, जुही आणि समायराचे 5 फोटोज..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...