Home | TV Guide | Julun Yeti Reshimgathi and Eka Lagnachi Tisari Goshta now in Hindi

मराठी मालिका आता हिंदीतही, 'जुळून येती...' व 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' आता झी टीव्हीवर

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 29, 2015, 12:20 PM IST

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेचे ‘सतरंगी ससुराल’मध्ये रुपांतर करुन अलीकडेच झी टीव्हीने मराठी मालिकेचे लोकप्रिय कथानक हिंदी पडद्यावर दाखवण्यास सुरूवात केली.

  • Julun Yeti Reshimgathi and Eka Lagnachi Tisari Goshta now in Hindi
    (‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’या मालिकांचे फोटो)
    मुंबईः ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेचे ‘सतरंगी ससुराल’मध्ये रुपांतर करुन अलीकडेच झी टीव्हीने मराठी मालिकेचे लोकप्रिय कथानक हिंदी पडद्यावर दाखवण्यास सुरूवात केली. आता ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या झी मराठी वाहिनीवरीलच लोकप्रिय मालिका येत्या 4-5 मेपासून हिंदीमध्ये डब करुन प्रसारित केल्या जाणार आहेत.
    ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या नावाने 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका हिंदीत दाखवली जाणार असून मालिकेतील कलाकारही मराठी मालिकेतीलच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आदित्य-मेघनाची जोडी साकारणारे ललित प्रभाकर व प्राजक्ता माळी आता हिंदीमध्ये प्रेमाच्या आणाभाका घेताना दिसतील.
    याशिवाय 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' ही मालिका ‘उम्मीद के रंग’ या नावाने हिंदीत दाखवली जाणार आहे. यातही उमेश कामत व स्पृहा जोशी यांचीच जोडी दिसणार असून या दोन्ही मालिकांमधील इतर कलाकारही केवळ डबिंग असल्याने मराठीतीलच असणार आहे. एकुणच हिंदीवर आता मराठी मालिकांच्या वाढत्या टीआरपीचा प्रभाव जाणवायला लागला आहे.

Trending