आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kajol Is Not Happy With Sister Tanisha And Armaan Kohli’S Relationship

तनिषा-अरमान यांच्या लग्नाला काजोलचा विरोध?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री काजोल बहीण तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहली यांच्या वाढत्या जवळीकमुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. अरमान आणि तनिषाच्या लव्ह स्टोरीला 'बिग बॉस 7'च्या घरात सुरूवात झाली होती. त्यांच्या फिजिकल रिलेशनच्या बातम्यासुध्दा समोर आल्या होत्या. तसे पाहता मुखर्जी कुटुंबीय सुरूवातीपासूनच यांच्या नात्याच्या विरोधात होते. तरीदेखील दोघांमधील जवळीक कमी झालेली नाही. त्यामुळे तनिषाची मोठी बहीण काजोल या नात्यावर नाराज आहे.
अलीकडेच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये काजोल पाहूणी म्हणून गेली होती. करण आणि काजोल यांची सुरूवातीपासूनच चांगली मैत्री आहे. शोमध्ये करणने काजोलला अनेक प्रश्न विचारून हैराण केले. त्यातील काही वादग्रस्त प्रश्न होते तर काही समाधानकारक. त्याच्या प्रश्नांनी काही वादग्रस्त मुद्दे बाहेर काढले हे मात्र नक्की.
जेव्हा करणने काजोलला तनिषाने 'बिग बॉस 7'मध्ये सहभाग घेण्याविषयी विचारले तेव्हा काजोलने न अडखळता त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. काजोल म्हणाली, की तनिषाने बिग बॉसमध्ये सहभाग घेऊन तिला आश्चर्याचा धक्काच दिला. करणने दुसरा प्रश्न विचारल्यानंतचर तिला त्याचे सविस्तर उत्तर देता आले नाही.
शेवटी करणने न राहवून तनिषा आणि अरमान यांच्या नात्याविषयी प्रश्न विचारले. करण म्हणाला, 'तुम्ही तुमच्या कुटुंबात अरमान कोहलीचे स्वागत करण्यास तयार आहात?'. परंतु काजोलने खूप चतुराईने या प्रश्नाचे उत्तर दिले आणि म्हणाली 'आपण बघू... आपण ही बातचीत उद्यासाठी ठेऊयात'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सविस्तर माहिती...