आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KRKने घेतला कपिलशी पंगा, टि्वटरवर उगाच घातला वाद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमाल रशिद खान आणि कपिल शर्मा, सोबतच कमालचे वादग्रस्त टि्वट
मुंबई: कमाल रशिद खान (केआरके) सतत त्याच्या वादग्रस्त आणि आपत्तिजनक टि्वट आणि कमेन्ट्सने चर्चेत असतो. ताजी बातमी आहे, की प्रसिध्द विनोदवीर कपिल शर्माविषयी त्याने असेच काही टि्वट केले आहे. कपिल आणि कमालमधील टि्वटर युध्द बघायला मिळत आहे.
दोघांचे भांडण केआरकेच्या एका टि्वटने सुरू झाले आहे. त्याने टि्वटमध्ये लिहिले आहे, 'जेव्हा YRFने नर्गिस फाखरीला विचारले, की ती कपिल शर्मासह सिनेमात काम करेल का? तिने स्मितहस्य देऊन सांगितले, की तिच्याकडे तारिख नाहीये.'
एवढेच नाही तर, केआरकेने पुढे लिहिले, 'नर्गिसचा एक एसएसएम- जेव्हा YRFने मला कपिलसह काम करण्याची ऑफर दिली तेव्हा मी अचंबित झाले. कदाचित तो विसरला आहे, की मला रणबीरसह लाँच करण्यात आले आहे.'
केआरकेचे हे टि्वट वाचून कपिलने आपले मौन सोडले आणि म्हणाला, 'कमाल आर खानमध्ये जर हिम्मत असेल तर मला फोन करावा. मी तुला दाखवून देईल एका पंजाबीसोबत डील करणे काय असते.' जेव्हा कपिलच्या अकाउंटवर हे टि्वट दिसत नव्हते तेव्हा कमालने लिहिले, 'कपिल मी खरंच घाबरलो. विश्वास ठेव, माझा अजूनही थरकाप उडत आहे.'
या भांडणाला संपुष्टात आणण्यासाठी कपिलने अखेर टि्वट केले, 'तुझ्यासाठी माझे हे शेवटचे टि्वट आहे... जर प्रसिध्द व्हायचे असेल तर स्वत:च्या बळावर काहीतरी कर...माझ्या नावाचा आधार नको घेऊ...' हे शेवटचे टि्वट करून कपिलने यासंबंधित इतर टि्वट डिलीट केले.
कमाल कपिलच्या शेवटच्या टि्वटनेसुध्दा थांबला नाही आणि कपिलविषयी बरे-वाईट बोलला.
तुम्ही स्वत:च बघा कमाल राशिद खानव्दारा कपिलविषयी केलेले टि्वट्स...पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...