आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनवीर गुर्जरला डेट करतेय ही घटस्फोटीत अॅक्ट्रेस? नात्याबाबत सोडले मौन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्या 'शक्ति : अस्तित्व के अहसास की'मध्ये विवियन दसेनाच्या आईची म्हणजे प्रितोची भूमिका करणाऱ्या काम्या पंजाबीने 'बिग बॉस 10' चा विनर मनवीर गुर्जरबरोबरच्या अफेयरच्या चर्चांबाबतचे मौन सोडले आहे. एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना काम्या म्हणाली, मनवीर फक्त माझा स्पेशल मित्र आहे. 

यामुळे झाली चर्चा सुरू... 
- काम्याने नुकत्याच झालेल्या झी-गोल्ड अवॉर्डदरम्यान निगेटिव्ह रोलसाठी बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार जिंकला आङे. त्यानंतर तिने इन्स्टाग्रावर फॅन्सचे आभार मानले. 
- एक फोटो शेयर करताना काम्याने लिहिले, मला वोट केलेल्या सर्वांचे आभार. याच पोस्टमध्ये मनवीर गुर्जरचा उल्लेख करताना तिने लिहिले होते, एखा खास व्यक्तीला खूप स्पेशल थँक्स. त्यानंतर मनवीर आणि काम्या यांच्या लिंकअपच्या चर्चा सुरू झाल्या. 

स्पष्टीकरण देताना काय म्हणाली काम्या.. 
- काम्याने स्पष्टीकरण देताना म्हटेल, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मनवीर बिग बॉसच्या घरात होता, तेव्हा मी त्याच्यासाठी वोट अपिल केले होते. आता मी गोल्ड अवॉर्ड्ससाठी नॉमिनेट झाले तेव्हा त्याने माझ्यासाठी वोट मागितले. त्यामुळे अॅवॉर्ड जिंकल्यानंतर त्याला स्पेशल थँक्स म्हटले. तो माझ्यासाठी खास आहे. 
- काम्याला जेव्हा त्यांची मैत्री प्रेमापर्यंत जाईल का, असे विचारले तेव्हा ती म्हणाली असे होणार नाही. तो कायम माझा चांगला मित्र राहील, त्यापेक्षा जास्त काहीही नाही. 

घटस्फोटीत आहे काम्या.. 
- काम्या पंजाबीचे लग्न बंटी नेगीबरोबर झाले होते. पण 2013 मध्ये तिचा घटस्फोट झाला. ती मुलीला एकटी सांभाळत आहे. नंतर काम्याचे नाव करण पटेलबरोबर जोडले गेले. 2015 मध्ये त्यांच्या ब्रेकअपचीही बातमी आली. नंतर करणने अॅक्ट्रेस अंकिता भार्गवबरोबर लग्न केले. 
- काम्याचे नाव प्रोड्युसर विकास गुप्ताबरोबरही जोडले गेले आहे. 

मनवीरनेही सोडले आहे पत्नीला..
- 'बिग बॉस 10' जिंकल्यानंतर मनवीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनेक दिवसांनंतर मनवीरने त्याचे लग्न झाले असून पत्नी त्याला सोडूनही गेली असल्याचे मान्य केले होते. 
- मनवीरने म्हटले होते, मी कधीही लग्नाबाबत लपवले नाही. 2014 मध्ये कुटुंबीय आणि बावनिक कारणांमुळे मी लग्न केले होते. पण 4-5 महिन्यांनी पत्नीबरोबरचे नाते खराब झाले आणि आम्ही वेगळे झालो. 
- शोमध्ये लग्नाबाबत लपवणे ही स्ट्रॅटर्जी नव्हती. मी शोमध्ये कशाचाही गैरफायदा घेण्याचा प्रयत्नही केला नाही. 
- मनवीरची एख मुलगीही असून तिचे नाव विविशा आहे. 
- 'बिग बॉस'च्या घरात मनवीप आणि नितिभा यांची जवळीक वाढली होती. पण त्यांनी कधीही अफेयर असल्याचे मान्य केले नाही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काम्या आणि मनवीर यांचे PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...