आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma Acts Pricey, Charges 1.25 Crore For CCL

जमीनीवर नाहीये कपिलचे पाय, CCLच्या होस्टिंगसाठी मागितले तब्बल 1.25 कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशाची चव चाखत असलेल्या कपिल शर्माचे पाय सध्या जमीनीवर नाहीये. कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमुळे कपिल शर्माला केवळच प्रसिद्धीच नव्हे तर भरपूर पैसाही मिळाला आहे. त्याच्या या शोमुळे कलर्स वाहिनीचा टीआरपी खूप वाढला आहे.
आता बातमी आहे, की एखाद्या कार्यक्रमात सादरीकरण देण्यासाठी त्याने आपले मानधन अव्वाच्या सवा वाढवले आहे. अलीकडेच त्याने सोहेल खानच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या या सीझनचे एक्स्ट्रा इनिंग होस्ट करण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये घेतले आहेत.
CCL (सेलिब्रिटी क्रिकेट लीग)शी निगडीत एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, CCL चे एक्स्ट्रा इनिंग होस्ट करण्यासाठी तब्बल सव्वा कोटींचे मानधन घेऊन कपिल देशातील सर्वात महागडा विनोदवीर ठरला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या याविषयी बरंच काही...