आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोमधून दर महिना 9 कोटी रुपये कमावतो कपिल शर्मा, जाणून घ्या इतर मेंबर्सची Fees

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः 'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. यामध्ये काम करणारे कॉमेडिअन्स प्रेक्षकांना हसवण्यासाठी कधी ग्रामीण महिलेच्या भूमिकेत झळकतात, तर कधी कधी नोकर, डॉक्टर बनतात. स्वतःवर विनोद करुन हे विनोदवीर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. याच्या मोबदल्यात हे सर्व विनोदवीर एक मोठी रक्कम मानधन म्हणून घेत असतात. या शोचा होस्ट कपिल शर्मा सध्याच्या काळात टीव्हीतील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, कपिल शर्माने सोनी वाहिनीसोबत एक नवीन करार साइन केला असून त्याला 110 कोटींची ऑफर मिळआली आहे. करारानुसार, आता कपिलचा हा शो डिसेंबर 2017 पर्यंत छोट्या पडद्यावर प्रसारित होणार आहे. यानुसार, कपिल दर महिना फक्त शोमधून तब्बल नऊ कोटींहून अधिकची कमाई करणार आहे. 

पूर्वी एका एपिसोडसाठी कपिलला मिळायचे 60 ते 80 लाख रुपये...  
बातम्यांनुसार, या करारापूर्वीपर्यंत कपिलला प्रत्येक एपिसोडसाठी 60 ते 80 लाखांच्या घरात मानधन मिळायचे. आता मात्र सोनी वाहिनीने त्याला वर्षभरासाठी 110 कोटींची ऑफर दिली आहे. शोचे मेकर्स कपिलच्या या शोमुळे आनंदी असून त्यांना एवढी मोठी रक्कम त्याला देण्यात काहीच अचडण नाही. याचे कारण म्हणजे कपिलच्या शोला सर्वाधिक रेटिंग्स मिळत आहेत. 
 
कपिलच नव्हे तर कपिलच्या शोमधील इथर मेंबर्ससुद्धा त्यांच्या लोकप्रियतेमुळे चांगली कमाई करत आहे. शोमधील प्रसिद्ध पात्र डॉक्टर मशहुर गुलाटीपासून ते सरला आणि लॉटरीसुद्धा चांगली कमाई करत आहेत.  या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'द कपिल शर्मा शो'मध्ये झळकणा-या कलाकारांच्या मानधनाविषयी माहिती देत आहोत. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या एका दिवसाला किती कमाई करतात हे विनोदवीर...

नोटः सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारावर देण्यात आले आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...