आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comedy Nights With Kapil Fame Kapil Sharma Before And After Photos

2007 ते आत्तापर्यंत एवढा बदलला कपिलचा लूक, पाहा Struggling Daysचे Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : कपिल शर्मा)
मुंबईः कलर्स वाहिनीवरील 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोने कपिल शर्माला एका रात्रीत स्टार बनवले. या शोला मिळालेल्या प्रचंड यशानंतर कपिलची गणना देशातील मोस्ट इलिजिबल बॅचलर्समध्ये होऊ लागली आहे. मात्र यशाची चव चाखताना कपिलला अनेकदा वादालाही सामोरे जावे लागले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक वेगळी चर्चा रंगू लागली आहे. ती म्हणजे कपिलने आपला लूक बदलला आहे. त्याची हेअर स्टाइल पुर्वीपेक्षा खूप बदलेली दिसते. सोशल मीडियावर कपिलची जुनी छायाचित्रे शेअर केली जात आहेत.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा त्याचा पहिला शो नाहीये. यापूर्वीच म्हणजे 2007 मध्ये 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये कपिल झळकला होता. त्यानंतर सहा वर्षांनी कपिलने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आणि 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोची निर्मिती केली.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमधील कपिलचा लूक बघता त्याने हेअर ट्रान्सप्लांट केले, असे म्हटले जाते. इतकेच नाही तर तो विगचा वापर करतो, अशीही चर्चा आहे. वरील छायाचित्रांमध्ये तुम्ही संघर्षाच्या काळातील आणि आत्ताच्या काळातील कपिलच्या लूकमधील फरक स्पष्ट बघू शकता.
divyamarathi.com तुम्हाला कपिलची संघर्षाच्या काळातील काही छायाचित्रे दाखवत आहे. ही छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...