आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 34 वर्षांचा झाला कॉमेडियन कपिल शर्मा, बालपणी दिसायचा असा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थोरले भाऊ अशोक यांच्यासोबत कपिल)
मुंबई- कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने आज वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. कपिलचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी अमृतसर येथे झाला. त्याची आई प्रेमाने त्याला टोनी म्हणते. कपिलचे वडील जितेंद्र शर्मा पोलिस कॉन्स्टेबल होते आणि त्याच्या आई राणी या गृहिणी आहेत. कपिलला एक बहीण आणि एक भाऊ आहे. अशोक शर्मा हे भावाचे तर पूजा शर्मा हे त्याच्या बहिणीचे नाव आहे. कपिल 15 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले होते. त्यावेळी कपिल दहाव्या वर्गात शिकत होता. वडिलांच्या निधनाचे दुःख कधीही त्याने घरच्यांसमोर दाखवले नाही. उलट आपल्या हलक्याफुलक्या विनोदाने तो सर्वांच्या चेह-यावर हसू आणायचा.
कपिलचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि सर्वाधिक टीआरपी मिळवणारा शो आहे. आज कपिल सर्वात महागडा टीव्ही होस्ट ठरला आहे. कपिलचा एका छोट्या थिएटर आर्टिस्टपासून ते महागडा होस्ट बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. रंगभूमीवर काम करत असताना त्याला बराच संघर्ष करावा लागला होता. मात्र आपल्या परिश्रमाच्या बळावर त्याने आज यशोशिखर गाठले आहे.
आज कपिलच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याची खासगी आयुष्यातील निवडक छायचित्रे दाखवत आहोत.