Home »TV Guide» Kapil Sharma Breaks Silence Over Fight With Sunil Grover

फायनली, कपिल शर्माने तोडले मौन, सुनील ग्रोवर मारहाण प्रकरणावर दिले हे स्पष्टीकरण

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 14:08 PM IST

सध्या यशाच्या शिखरावर असलेला कॉमेडियन कपिल शर्मा याने त्याचा सहकलाकार सुनील ग्रोवर याला मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. कपिल शर्मा आपल्या टीमसोबत ऑस्ट्रेलियावरून दिल्लीमार्गे मुंबईला परतत असताना ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मासोबत सुनील ग्रोवरही होता. सिडनी आणि मेलबर्न येथील शोनंतर ‘दी कपिल शर्मा शो’ची अख्खी टीम बिझनेस क्लासमधून प्रवास करत होते. कपिल शर्मा नशेत धूत होता. नशेत असतानाच त्याची व सुनीलची कशावरून तरी बाचाबाची झाली. यानंतर कपिलने सुनीलला शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणावर आता कपिल शर्माने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने फेसबुकवर चाहत्यांच्या नावाने एक मेसेज पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये कपिलने लिहिले, ‘मी सुनीलचा आदर करतो. हो, आमच्यात काही कारणास्तव खटके उडाले… पण, आम्ही सर्वसामान्य व्यक्ती नाही का? गेल्या पाच वर्षांत मी पहिल्यांदाच त्याच्यावर इतक्या मोठ्याने ओरडलो. एवढं तर चालतं… आमच्यात जे काही मतभेद आहेत त्यावर आम्ही बसून तोडगा काढू. एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून मी त्याचा (सुनीलचा) नेहमीच आदर करतो.’

पुढे वाचा, शोसाठी अडसर ठरणार हे भांडण...

Next Article

Recommended