आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

री-न्यू झाला कपिलचा चॅनलसोबतचा करार, छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा हसवण्यास होणार सज्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः विनोदवीर कपिल शर्मा आणि सोनी टीव्ही यांच्यातील करार री न्यू झाला आहे.  कपिलचा शो काही काळासाठी ब्रेक घेणार असून नवीन अंदाजात सोनी टीव्हीवर परतणार आहे. सोनी टीव्हीचे ईवीपी आणि हेड दानिश खान यांनी सांगितले, "दर आठवड्याला 'द कपिल शर्मा शो' जगभरातील हजारो-कोट्यवधी चाहत्यांच्या चेह-यावर हास्य फुलवतो. कपिलमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आमचे नाते आणखी घट्ट करतोय. कपिल आणि त्याची टीम यापुढेसुद्धा जगभरातील प्रेक्षकांना हसवत राहणार, याचा आम्हाला विश्वास आहे." 

काय म्हणाला कपिल शर्मा...
- याविषयी कपिल म्हणाला, "वर्षभर प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिले, त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत. माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला. दर आठवड्याला सादरीकरणात नाविन्य ठेवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. मी सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीचा आभारी आहे, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि प्रत्येक आठवड्याला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी दिली."

बदलणार आहे शोचा फॉर्मेट, वाचा पुढील स्लाईडवर...
 
बातम्या आणखी आहेत...