आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma: “I’D Be Happy To Have Sunil Grover Back On My Show”

\'कॉमेडी...\'मध्ये होणार \'गुत्थी\'चे पुनरागमन, कपिलने म्हटले WELCOME

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुत्थी अर्थातच सुनील ग्रोवर पुन्हा एकदा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा आहेत. बातमी आहे, की त्याने या शोमध्ये पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अद्याप हे स्पष्ट झालेले नाहीये, की तो कधीपासून शोमध्ये दिसणार आहे. परंतु 'कॉमेडी नाइट्स...'चा होस्ट त्याच्या पुनरागमनाच्या निर्णयावर आनंदी आहे.
कपिलने सांगितल्याप्रमाणे, स्वत: गुत्थीने शोमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा त्याच्याकडे व्यक्त केली आहे. तो म्हणतो, 'मी लंडनहून आलेल्या मित्रासोबत मुंबईमधील एका हॉटेलमध्ये गेलो होते. तिथे सुनील ग्रोवर मला अचानक भेटला. बातचीतदरम्यान तो मला म्हणाला, की 'कॉमेडी नाइट्स...'मध्ये पुनरागमन करायचे आहे.'
कपिलने सुनीलच्या या निर्णयाने आनंद व्यक्त करून सांगितले, 'मी त्याची विनंती चॅनलला सांगितली आहे. आता हा त्याच्या आणि चॅनलमधील प्रकरण आहे. त्याची शोमध्ये एंट्री माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. शोचे इतर स्टार्सनी किकू शारदा, अली असगर, उपासना सिंह, चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रवर्ती त्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. परंतु सुनीलने वेगळी वाट निवडली आणि आता त्याला पुन्हा येण्याची इच्छा आहे, तर त्याचे स्वागत आहे.'
'कॉमेडी नाइट्स...'मध्ये गुत्थीच्या पात्रापासून सुनील ग्रोवर खूप प्रसिध्दी मिळाली. परंतु अचानक काही मतभेद झाल्याने त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. 'कॉमेडी नाइट्स...' सोडल्यानंतर तो स्वत:चा 'मॅन इन इंडियी' छोट्या पडद्यावर घेऊन आला. परंतु या शोला प्रेक्षकांनी पसंती दिली नाही. 'मॅड इन इंडिया'च्या अपयशामुळे शो डबाबंद झाला. आता सुनील 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'कॉमेडी नाइट्स...'मध्ये काही अशाप्रकारे केले आहेत गुत्थीने मनोरंजन...