आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma Is Not Following Sunil Grover On Twitter

कपिलने असा व्यक्त केला राग, टि्वटरवर \'गुत्थी\'ला केले UNFOLLOW

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चित असलेला 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोचा होस्ट कपिल त्याचा जूना सहकारी सुनील ग्रोवरवर खूप नाराज असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.. सुनील ग्रोवर अर्थातच 'गुत्थी'ने जेव्हा कपिलचा शो सोडला होता, तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली होती. वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. सुनीलच्या 'गुत्थी' या पात्राला सर्व प्रेक्षक इतके पसंत करत असताना सुनीलने हा शो अचानक का सोडला, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
सुनीलचे शो सोडण्याचे कारण जेव्हा -जेव्हा कपिलला विचारले गेले, तेव्हा त्याने एकच उत्तर दिले, की प्रत्येकाला पुढे जाण्याचा हक्क आहे आणि जर एखादी व्यक्ती सक्षम आहे तर तिला काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळते. कपिलने असेसुध्दा सांगितले होते, की सुनीलवर त्याचा कोणत्याही प्रकारचा राग नाहीये.
कपिल आतापर्यंत सुनीलला टि्वटरवर फॉलो करत होता, परंतु अचानक त्याने सुनीलला अनफॉलो केल्याची एक रंजक बातमी समोर आली आहे. सोबतच कपिलने टि्वटर अकाउंटवरील त्याचे सुनीलसोबतचे छायाचित्रेसुध्दा डिलीट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या याविषयी अधिक माहिती...