आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मा डिप्रेशनमध्ये, भेटच नाही तर बोलणेही टाळतोय; 'फिरंगी'ने दिला 30 कोटींचा झटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा. - Divya Marathi
कपिल शर्मा.

मुंबई - कॉमेडियन आणि अॅक्टर कपिल शर्मा डिप्रेशनमध्ये गेला आहे. तुम्ही म्हणाल, आता यात नवीन ते काय हे, तर नेहमीचेच आहे... यावेळी कपिलच्या डिप्रेशनचे कारण आहे, 30 कोटी रुपये तोटा ! गेल्याच आठवड्यात कपिल शर्माची निर्मीती आणि लीड रोल असलेला 'फिरंगी' रिलीज झाला, या फिल्ममुळे कपिलला तब्बल 30 कोटींचा तोटा झाला आहे. राजीव ढिंगरा दिग्दर्शित या फिल्मध्ये कपिलने 40 कोटी रुपये गुंतवले होते, त्यापैकी फक्त 10 कोटी रुपये कमाई झाली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे, की फिल्म फ्लॉप झाल्याने कपिल पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये गेला आहे. 

 

स्पॉन्सर्सला दिले होते वचन, फिल्म सक्सेसफूल होणार    
- सूत्रांच्या माहितीनुसार, कपिलने स्पॉन्सर्सला वचन दिले होते, की फिल्म सक्सेसफूल राहिल. त्याला विश्वास होता की फिल्म कमीत कमी 50 कोटींचा बिझनेस करेल. मात्र बॉक्स ऑफिसवर फिल्मने जोरदार आपटी खाल्ली आहे. 
- बॉक्स ऑफिसवर फिल्मला एवढा वाईट प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही कपिलने केली नव्हती. 

 

सर्वांशी बोलणे टाळले... 
- DainikBhaskar.comला सूत्रांनी सांगितल्यानुसरा, कपिल सध्या कोणाशीही बोलत नाही. त्याने सर्वांशी संवाद बंद केला आहे. 
- त्याला आपेक्षा होती की काही चांगले रिव्ह्यूज येतील आणि त्यानुसार त्याने फिल्म रिलीजनंतर काही प्रमोशनल अॅक्टिव्हिटीज प्लॅन केले होते. 
- आता या सर्व अॅक्टिव्हिटीज कपिलच्या मनातच राहिल्या आहेत.  एका चॅनलने कपिलसोबत शो करण्याचीही प्लॅनिंग केली होती, त्यासाठी चॅनलने कपिलला फ्लाइटचे तिकीटही दिले होते, त्यासोबतच सर्व सुविधा देऊ केल्या होत्या. मात्र ऐनवेळी कपिलने सर्व प्रोग्राम कँसल केला आहे. त्यामुळे चॅनलला संपूर्ण शो थांबवाव लागला. 
- असेही म्हटले जात आहे की कपिल शर्मा लोकांना भेटणे टाळत आहे. चित्रपटाला मोठे नुकसान झाल्यामुळे तो तणावात आहे. 
- कपिल शर्माचे फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स त्याला स्ट्रेसफ्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये, याआधीही गेला होता डिप्रेशनमध्ये, 3 महिने घेतली थेरपी...

बातम्या आणखी आहेत...