आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शो बंद झाला तरी सवय गेली नाही, कपिलने अक्षय कुमारला 5 तास ताटकळत ठेवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा आणि अक्षय कुमार - Divya Marathi
कपिल शर्मा आणि अक्षय कुमार
मुंबई - कॉमेडियन अॅक्टर कपिल शर्माचा शो बंद झाला असला तरी लोकांना वाट पाहायला लावण्याची त्याची सवय काही गेलेली नाही. काही दिवसांपूर्वी कपिलने अक्षय कुमारला 5 तास वाट पाहायला लावली. कपिलची अपकमिंग फिल्म 'फिरंगी'च्या प्रमोशनसाठी तो अक्षय कुमारचा 'शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'साठी शूट करणार होता. मात्र तो वेळेवर सेटवर पोहोचला नाही त्यामुळे त्याच्याशिवाय शो शूट करण्यात आला. 
 
कपिलचा फोनही नॉट रिचेबल 
- रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारची इच्छा होती की या स्पेशल शोची शुटिंग सकाळी लवकर केली जावी. मात्र कपिलच्या टीमने शेड्यूल बदलून मागितला आणि 11 वाजता शूट करण्याचे ठरले. 
- जवळपास 10.30 वाजता सर्वजण सेटवर हजर झाले होते. मात्र कपिल आला नव्हता. सर्वजण त्याचा फोन ट्राय करायला लागले, मात्र तोही नॉट रिचेबल होता. 
- विशेष म्हणजे दुपारी 2 पर्यंत कपिलच्या टीमला माहित नव्हते की तो कुठे आहे. 
- बराचवेळ वाट पाहिल्यानंतर अखेर अक्षयने कपिलशिवाय शो शूट करण्याचा सल्ला दिला. तेव्हा कपिलच्या टीममधील एकाने सांगितले की त्याची तब्ब्यत बिघडली असून डॉक्टरने त्याला आराम करण्यास सांगितला आहे. 
- कपिल न आल्यामुळे ऐनवेळी स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात आला आणि शो शूट झाला. 
 
साजिद खानने दिला दुजोरा 
- शोचा जज साजिद खानला याबद्दल विचारले असता तो म्हणाला, की 'कपिलची तब्ब्यत खराब झाल्याचे मी ऐकले आहे.' 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शाहरुख-विद्या बालनला किती वेळ पाहावी लागली वाट...
बातम्या आणखी आहेत...