आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REVEALED: कपिलचे लग्न झालेच नाही, सिनेमासाठी एली-कपिल बनले वर-वधू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एली अवराम आणि कपिल शर्मा - Divya Marathi
एली अवराम आणि कपिल शर्मा
मुंबई- काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कपिल शर्माचे एक छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोत कपिल चक्क नवरदेवाच्या रुपात दिसतोय. या छायाचित्रावरुन कपिलने लग्न थाटले की काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. कपिलने गुपचूप लग्न थाटल्याची बातमीच सर्वत्र पसरली. मात्र आता या फोटोमागचे सत्य उघड झाले आहे. खरं म्हणजे हा लीक झालेला फोटो कपिलच्या एका सिनेमाच्या शूटिंगमधील आहे.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमुळे प्रसिद्धीचे यशोशिखर गाठणारा कपिल आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय. अब्बास मस्तान यांच्या आगामी 'किस किसकों प्यार करुं' या सिनेमाद्वारे तो सिल्व्हर स्क्रिनवर झळकणारेय. सध्या तो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यामध्ये अभिनेत्री एली अवराम त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकणारेय. कपिल-एलीचा हा फोटो सेटवरुन लीक झाला आहे. या फोटोत कपिल आणि एली वर-वधूच्या रुपात दिसत आहेत. या सिनेमात या दोघांव्यतिरिक्त अरबाज खान, वरुण शर्मा, मंजरी फडनीस आणि सिमरन कौर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'किस किसको प्यार करुं' या सिनेमाच्या सेटवर क्लिक झालेले एली आणि कपिलचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...