आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Buzz: अवॉर्ड्स नाइटमध्ये कपिलने प्यायली दारू, महिलांसोबत केले गैरवर्तन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : कपिल शर्मा

मुंबई-
विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकला आहे. यावेळी त्याच्यावर को-स्टार्ससोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप लागला आहे. हे प्रकरण अलीकडेच झालेल्या अंतरराष्ट्रीय मराठी फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स (IMFFA)मधले आहे. एका प्रतिष्ठीत एंटरटेन्मेंट वेबसाइटनुसार, इव्हेंटदरम्यान कपिलने दारू प्यायली होती. तो नशेत बुडाल्याने मोनाली ठाकूर, तनिषा मुखर्जी आणि इतर महिलांसोबत गैरवर्तणूक केली. बातमी अशीही आहे, की कपिल शर्माची गर्लफ्रेंडसुध्दा या घटनेवेळी येथे उपस्थित होती. तिने यानंतर हा कार्यक्रम अर्ध्यातच सोडून दिला आणि निघून गेली.
कपिल म्हणाला- मुंबईला येऊन बोलेल
या प्रकरणाविषयी कपिलशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्याने हसून उत्तर दिले, 'मी मुंबईला आल्यावर या प्रकरणावर बोलेल.' मात्र त्याने नुकतेच केलेल्या टि्वटवरून दिसते, की त्याने या प्रकरणाविषयी बातचीत केली आहे. कपिलने टि्वट केले, 'I fall, I rise, I make mistakes, I live, I learn, I've been hurt but I am alive.i am human, I am not perfect but I am thankful :)' IMFFA 2015 सोहळा इटलीच्या पीसा शहरात झाला.

अनेक सेलेब्स IMFFA 2015मध्ये झाले सामील
IMFFAमध्ये बॉलिवूड आणि टीव्हीचे अनेक सेलेब्स पोहोचले होते. त्यामध्ये गायक मीका सिंह, मोनाला ठाकूर, कणिका कपूर, अभिनेत्री तनुजा, तनिषा मुखर्जी, सनी लिओन, अभिनेता सुनील शेट्टी, सुमित राघवन आणि सचिन पिळगावकरसह अनेक सेलेब्स सामील झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या कार्यक्रमात पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...