आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma Preeti Simoes Love Affair Wedding Ginni Chatrath

'कॉमेडी नाइट्स'च्या सेटवर कपिलला गवसला जोडीदार, क्रिएटीव्ह डायरेक्टरसह थाटणार लग्न !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कॉमेडी किंग' म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोची क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रीति सिमोसह लग्न करणार आहे. कपिलने त्याची कॉलेज फ्रेंड गिनी चतरथसह साखरपुडा केल्याची बातमी दिवसांपूर्वी आली होती. कपिल आणि गिनीने 'हंस बलिए' या शोमध्ये एकत्र काम केले होते. मात्र आता गिनी कपिलच्या आयुष्यातून बाहेर पडली असून तिची जागा प्रीतिने घेतली असल्याची चर्चा आहे.
प्रीति आणि कपिल डेटिंग करत असल्याची बातमी आहे. 'कॉमेडी सर्कस' या शोमदरम्यान दोघांमध्ये सूत जुळले होते. या दोघांना स्टार प्लसवर सुरु असलेल्या 'नच बलिए' या शोमध्ये सहभागी होण्याची ऑफरसुद्धा देण्यात आली होती. मात्र कपिल आणि प्रीतिने ती ऑफर स्वीकारली नाही.
कपिलच्या एका जवळच्या मित्राने सांगितल्यानुसार, 'कॉमेडी सर्कस' या शोदरम्यान कपिल आणि प्रीतिने साखरपुडा केला होता. त्यानंतर दोघांनी मिळून कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोची निर्मिती केली.
प्रीति ब-याच वर्षांपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करत आहे. आता पुढील वर्षी कपिल आणि प्रीति लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.
वरील छायाचित्र हे सिद्धूच्या वाढदिवसाचे असून कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या सेटवर ते क्लिक करण्यात आले आहे. या छायाचित्रात सिद्धू प्रीतिला केक भरवत आहे. सिद्धूच्या शेजारी कपिलसुद्धा दिसतोय.