आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनस्क्रिन पत्नीसह दुबईला पोहोचला कपिल, पाहा \'कॉमेडी नाइट्स...\'मधील सदस्यांचे Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्टँडअप कॉमेडीअन कपिल शर्मा)
मुंबई: स्टँडअप कॉमेडिअन कपिल शर्मा सध्या दुबईमध्ये धमाल-मस्ती करण्यात व्यस्त आहे. विशेष म्हणजे, तो या टूरवर त्याची ऑनस्क्रिन पत्नी मंजूसह (सुमोना चक्रवर्ती) 'कॉमेडी नाइट्स...'च्या क्रू मेंबर्सना घेऊन गेला आहे. कारण 'कॉमेडी नाइट्स...' हा टीव्ही शो दुबईला शिफ्ट झाला आहे. अलीकडेच, या एपिसोडचा टीजर कपिलने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला होता.
या टीजरमध्ये कपिल त्याच्या सर्व कुटुंबीयांसोबत मस्ती करताना दिसतो. कपिलने लोकांच्या मागणीनुसार दुबईमध्ये हा एपिसोड शूट केला आहे. कपिलच्या या शोमध्ये बिपाशा बसुसुध्दा दिसणार आहे. कपिलने टि्वटरवर लिहिले, बिपाशा आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तू नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत आहेस.
कपिलची ऑनस्क्रिन पत्नी सुमोनाने दुबईमध्ये काढलेली छायाचित्रे टि्वटरवर पोस्ट केली आहेत. त्याने टि्वटरवर असेही लिहिले, की त्यांनी दुबईमध्ये आउटडोअर शूटिंग केले आहे. येथे खूप गरमी आहे. परंतु मला आशा आहे, की तुम्हाला सर्वांना शोचा हा भाग नक्की पसंत पडेल. कपिल शर्मा एका फोटोमध्ये यार्टवर टायटॅनिक पोझ देताना दिसतोय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कपिलचे त्याच्या ऑनस्क्रिन कुटुंबीयांसह काही छायाचित्रे...