आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma Show First Episode Of His New Show With Team And Shah Rukh Khan

PHOTOS: कपिलने शाहरुखसोबत शूट केला नवीन शोचा पहिला एपिसोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटिंगदरम्यान शाहरुखसोबत कपिल - Divya Marathi
शूटिंगदरम्यान शाहरुखसोबत कपिल
 
मुंबई: कपिल शर्माने सोमवारी (11 एप्रिल) नवीन दिल्लीमध्ये नवीन शोच्या पहिला एपिसोडचे शूटिंग केले. \'द कपिल शर्मा शो\' शिर्षक असलेल्या या शोचा पहिला पाहूणा शाहरुख खान असणार आहे. सोमवारी शाहरुखसुध्दा कपिल आणि त्याच्या टीम मेंबर्ससोबत (सुमोना चक्रवर्ती, कीकू शारदा, अली असगर सुनील ग्रोवर आणि चंदन प्रभाकर) दिसला. 
 
वेश्याच्या रुपात अली...
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, पहिल्या एपिसोडदरम्यान कपिलचे टीम मेंबर्स विविध रुपांत दिसले. 
- अली असगरने सेटवर वेश्याच्या रुपात एंट्री केली, तिला शाहरुखला किस करायचे होते. तसेच कीकू शारदा त्या वेश्याच्या पतीच्या भूमिकेत दिसला. 
- सुनील ग्रोवर यावेळी एका पोलिस अधिका-याच्या रुपात दिसून आला, तो हरियाणवी आहे. 
- शाहरुखानने पहिल्या एपिसोडच्या शूटिंगदरम्यान बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. सोबत गौरीसोबतच्या लव्ह-अफेअरविषयीसुध्दा सांगितले. 
- यादरम्यान सुनील ग्रोवर गौरवच्या (\'फॅन\' सिनेमातील शाहरुखची एक भूमिका) गेटअपमध्येसुध्दा दिसला. इतकेच नव्हे तर त्याने \'जबरा फॅन\'वर डान्सदेखील केला. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पहिल्या एपिसोडच्या शूटिंची छायाचित्रे...