आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन कपिल शर्माने सुरु केले बॉलिवूड सिनेमाचे शूटिंग, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रोड्यूसर राकेश उपाध्यायसोबत कपिल शर्मा)
मुंबईः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोचा होस्ट आणि कॉमेडियन कपिल शर्माने आपल्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात कपिल शर्मा एक दोन नव्हे तर पाच अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसेल.
दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान या सिनेमाचे दिग्दर्शक असून सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खानचीदेखील मुख्य भूमिका या सिनेमात आहे. अद्याप या सिनेमाचे शीर्षक गुलदस्त्यात आहे. अरबाज खान आणि कपिल शर्माने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे.
अरबाज खानने ट्विट केले, "मुहूर्ताचा शॉट पूर्ण झाला आहे. कपिल शर्मा या सिनेमाद्वारे डेब्यू करत आहे. हा एक सुपर कॉमेडी सिनेमा आहे. मी त्याच्यासोबत काम करतोय."
कपिलने ट्विट केले, "सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस, तुमच्या शुभेच्छा हव्या आणि खूप सारे प्रेमसुद्धा."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शूटिंगच्या पहिल्या दिवसाची छायाचित्रे...