आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे सुरू आहे कपिल शर्मावर उपचार, सांगितले शोमधून ब्रेक घेण्यामागचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमेडियन कपिल शर्मा सध्या बेंगळुरूमध्ये आयुर्वेदीक ट्रिटमेंट घेत आहे. - Divya Marathi
कॉमेडियन कपिल शर्मा सध्या बेंगळुरूमध्ये आयुर्वेदीक ट्रिटमेंट घेत आहे.
मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा सध्या बेंगळुरूमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट गेत आहे. एका इंग्रजी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत कपिलने हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत कपिलने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.  

मुंबई मिररशी बोलताना कपिलने म्हटले की, सध्या मी बेंगळुरूमध्ये आयुर्वेदीक ट्रिटमेंट घेत आहे. हेल्दी कमबॅक करण्यासाठी मला माझे शरीर तंदुरुस्त करणे गरजेचे आहे. सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत मी मुंबईला परत येईल अशी अपेक्षा आहे. मीडियामध्ये येणाऱ्या बहुतांश बातम्या हा खोट्या असल्याचेही त्याने सांगितले. 
 
कपिल म्हणाला, मी गेल्या 10 वर्षांपासून ब्रेक न घेता काम करत आहे. आता मला ब्लड प्रेशर, शुगर प्रॉब्लेम आणि अनबॅलेन्स्ड डाएट योग्य व्हावे यासाठी मेडिकल हेल्पची गरज आहे. त्यामुळे मी विचार केला की, नियंत्रणाबाहेर जाईल अशी परिस्थिती निर्माण होण्याआधीच ब्रेक घेण्याची ही योग्य वेळ आहे. 10 वर्षे आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता मी याकडे लक्ष देत आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कपिल काय म्हणाला इतर कॉन्ट्रव्हर्सीजबाबत..
 
बातम्या आणखी आहेत...